आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:राज्यातील स्थलांतरितांसाठी भरारी पथक नेमा; शरद पवारांची सूचना

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्थलांतर करू इच्छिणाऱ्या लोकांचे बिकट प्रश्न ऐरणीवर आले आहेत

औरंगाबादच्या करमाडजवळ रेल्वे अपघातात १६ मजूर ठार झाल्याच्या घटनेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दु:ख व्यक्त केले आहे. राज्यातील स्थलांतरित मजुरांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्यासाठी राज्य सरकारने भरारी पथके स्थापन करावीत, अशी सूचनाही त्यांनी केली. 

शरद पवार यांनी ट्विट करून या घटनेवर दु:ख व्यक्त करतानाच स्थलांतरितांच्या सुरक्षित प्रवासासाठी राज्य सरकारला महत्त्वाची सूचनाही केली आहे. औरंगाबादजवळील करमाड रेल्वे दुर्घटनेत मजुरांच्या मृत्यूची बातमी अतिशय व्यथित करणारी आहे. कोरोना महामारीच्या काळात या अपघाताने पायी चालत आपल्या मूळ गावी स्थलांतर करू इच्छिणाऱ्या लोकांचे बिकट प्रश्न ऐरणीवर आले आहेत. 

राज्य सरकारने स्थलांतरित मजुरांसाठी भरारी पथकांची नियुक्ती करावी. तसेच या मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यापर्यंत सातत्याने पाठपुरावा करावा, अशी सूचना करतानाच केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन प्रश्नांची सोडवणूक करावी,  असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...