आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. तसेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सुरु असलेल्या आजच्या भारत बंदमध्ये सहभागी आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना कृषी बिलाचे समर्थन करत असल्याचे दिसत आहे. 'सरकारने निर्णय मागे घेतला तर आपण दहा वर्षे मागे जाऊ' असे मत अनिल शिदोरे यांनी सोमवारी व्यक्त केले.
कृषी कायद्याला मनसेचे समर्थन
मनसे नेता अनिल शिदोरे यांनी सोशल मीडियावर म्हटले की, ''आपण वर्षानुवर्ष पाहिले की कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी हीच शेतकरी वर्गावर अन्याय करते आहे. त्याचा बिमोड करायचा म्हणून संसदेत तीन कृषी विषयक कायदे मंजूर झाले, आता इथून सरकारने माघार घेतली तर शेतकरी पुन्हा भ्रष्टाचारी व्यवस्थेत भरडला जाईल''. सरकारने माघार घेऊ नये, अशी मागणी शिदोरे यांनी केली आहे.
पुणे, नवी मुंबईसह राज्यातील या जिल्ह्यांमध्ये कृषी मंडळे बंद राहतील
मथाडी श्रमिक नेता आणि आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ या बंदमध्ये सहभागी आहोत. नवी मुंबई एपीएमसीचे सर्व 5 बाजार आज बंद राहणार आहेत. राज्यातील नाशिक, पुणे, अहमदनगर आणि कोल्हापुरातील बाजार समित्या आज बंद राहणार आहेत.
बंदमध्ये मुंबईतील टॅक्सी युनियनचा समावेश नाही
मुंबईच्या टॅक्सी युनियनने आजच्या भारत बंदच्या समर्थनाचे संप आवाहन केले नाही. 'भारत बंद'च्या समर्थनार्थ आम्ही आमच्या सेवा थांबवणार नसल्याचे टॅक्सी युनियनने म्हटले आहे.
आज राज्यात दूध, फळे व भाजीपाला पुरवठा होणार नाही
राज्यात बंदच्या वेळी मेडिकल आणि किराणा दुकाने सुरु राहणार आहेत. बंद दरम्यान दूध उत्पादक संघाने संपूर्ण राज्यात दूध पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय भाजीपाल्याचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. या बंद दरम्यान राज्यातील सर्व रेस्तराँ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.
या तीन कायद्यास आहे विरोध
मूल्य उत्पादन आणि कृषी सेवा कायदा, 2020
अत्यावश्यक वस्तू (संशोधन) कायदा, 2020
शेतकरी उत्पादन व्यापार व वाणिज्य (संवर्धन आणि सुविधा) कायदा, 2020
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.