आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत बंद:आघाडी सरकारची भूमिका दुटप्पी असल्याच्या फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांनी दिले उत्तर, म्हणाले - 'आजचे बोला, 10 वर्षांपूर्वीच नाही'

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बंदमध्ये सहभागी होण्याची या सर्व राजकीय पक्षांची दुटप्पी भूमिका आहे असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला होता.

भारत बंदला पाठिंबा देण्यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. शेतकरी विधयेकांवरुन या पक्षांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका त्यांनी केली होती. आता याला शिवसेना खासदार संजय राऊतांनी सडेतोड उत्तर दिले आहे. '10 वर्षांपूर्वीचे नाही, तर आजचे बोला' असे राऊत म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचे एपीएमसीबद्दलचे जुने पत्र वाचून दाखवत टीका केली होती. याबद्दल संजय राऊत म्हणाले की, 'आता जर उत्खनन करायचे म्हटले तर खूप लांबपर्यंत जाता येऊ शकते. आज देशात काय सुरु आहे., 10 वर्षांपूर्वीचे बोलू नका. शेतकरी आज रस्त्यावर आहे. 'शेतकऱ्यांनो, रस्त्यावर या' असे आवाहन शिवसेना, राष्ट्रवादी आणि तृणमृल काँग्रेसने केलेले नाही. जो शेतकरी रस्त्यावर उतरला त्याला कुणाचेही पाठबळ नाही. कोणताही राजकीय पक्ष त्यांच्याबाजूने उभा नाही, शेतकऱ्यांच्या हातात कोणताही राजकीय झेंडा नाही. त्यामुळे विरोधी पक्षाने हे नीट समजून घ्यायला हवे. आपण विरोधी पक्षनेते म्हणून काय भूमिका घेतोय याचा त्यांनी 10 वेळा विचार केला पाहिजे' असा टोलाही राऊतांनी फडणवीसांना लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते
देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, 'शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आयोजित करण्यात आलेल्या 'भारत बंद'ला समर्थन देणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पक्ष, आम आदमी पार्टीने वेळोवेळी मोदी सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांना पाठिंबा दिलेला होता. बंदमध्ये सहभागी होण्याची या सर्व राजकीय पक्षांची दुटप्पी भूमिका आहे असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला होता.

देवेंद्र फडणवीस यांनी कृषी कायद्यांबाबत पवार दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला होता

‘भारत बंद’च्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यूपीए सरकारमध्ये कृषिमंत्री असताना पाठवलेले बाजार समितीच्या माॅडेल अॅक्टबाबतचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल करून भाजपच्या आयटी सेलने राष्ट्रवादीची चांगलीच कोंडी केली होती. बाजार समित्या मोडीत काढण्यास व शेतमाल नियमनमुक्तीसाठी पवार प्रयत्नशील होते हे भाजपने दाखवून दिले. यामुळे शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिलेल्या राष्ट्रवादीला सारवासारव करण्यासाठी धावाधाव करावी लागली. दरम्यान, पवार यांचे जुने पत्र सकाळी सोशल मीडियावर व्हायरल होताच सायंकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कृषी कायद्यांबाबत पवार दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser