आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत अशी स्पष्ट भूमिका घेत शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा नवे ट्विट केले आहे. यात त्यांनी शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची निवड केली असून प्रतिशिवसेना चालवण्याचा त्यांचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
शिंदेंनी आपल्या अधिकारात परस्पर शिवसेनेचे प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती करत एक प्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हानच दिले आहे. यानंतर मुख्यमंत्री काय निर्णय घेता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा उपाध्यक्षांना शिंदेंचे पत्र
एकनाथ शिंदेंकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र लिहले असल्याची माहिती समोर आली आहे. यात शिवसेनेच्या 34 आमदारांच्या स्वाक्षरी सहित हे पत्र पाठवण्यात आली आहे.
काय आहे शिंदेंचे ट्विट?
शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत. असे ट्विट त्यांनी केले आहे.
आधीही घेतला होता आक्षेप
गटनेते पदावरून हटवल्यानंतरही हा निर्णय़ बेकायदेशीर असल्याचे शिंदे यांनी म्हटले होते. आपल्याकडे बहुमत असल्याने असा निर्णय घेता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर आता त्यांनी प्रभू यांनी काढलेल्या व्हीपलाही आव्हान दिले. आपल्याकडील आमदारांच्या बहुमताच्या जोरावर त्यांनी प्रभूंना पदावरून हटवत थेट मुख्यमंत्री ठाकरेंना आव्हान दिले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.