आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत जोडो यात्रा:राज्यात काँग्रेसची भारत जोडो यात्रा 383 किमीची

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ७ सप्टेंबरपासून सुरू होणारी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरला देगलूरमध्ये प्रवेश करेल. नांदेडमार्गे पुढे ही यात्रा ६ दिवसांत ३८३ किमीचे अंतर राज्यातून पार करेल, अशी माहिती काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी दिली. स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी महात्मा गांधी यांनी १९४२ साली ‘चले जाव’चा नारा दिला आणि अख्खा देश एकवटला होता. आता पुन्हा एकदा जुलमी सरकारच्या विरोधात एक होण्याची वेळ आली आहे. माणसामाणसांमध्ये भेद करण्याचे, विषमतेचे, द्वेषाचे राजकारण मागील काही वर्षांपासून वाढीस लागले असून याला छेद देऊन एकोपा निर्माण करण्याची गरज आहे. लोकशाही, संविधान धोक्यात आले आहे. अशा वेळी देशाच्या एकतेसाठी पुढाकार घेण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाची असून त्यासाठीच भारत जोडो यात्रा आयोजित करण्यात आली आहे, असे थोरात यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

बातम्या आणखी आहेत...