आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Bharat Sasne Award | Marathi News | Announcement Of State Government Literary Awards; Lifetime Achievement Award Announced For Senior Literary Bharat Sasane

विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार:राज्य शासनाच्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा; ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाचा यंदाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक तथा उदगीरच्या अ.भा.साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे यांना जाहीर करण्यात आला आहे. पाच लाख रु. रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने दरवर्षी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साहित्यिकांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. बुधवारी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. श्री. पु. भागवत पुरस्कार (२०२१) लोकवाङ्मय गृह, मुंबई या संस्थेला जाहीर करण्यात आला.

तीन लाख रुपये रोख आणि मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यास पुरस्कार रमेश वरखेडे यांना जाहीर करण्यात आला. दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (२०२१, व्यक्तींसाठी) डॉ. चंद्रकांत पाटील यांना जाहीर करण्यात आला. डॉ. अशोक केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२१ (संस्थेसाठी) मराठी अभ्यास परिषद पुणे यांना जाहीर करण्यात आला. कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार २०२१ (संस्थेसाठी) मराठी अभ्यास केंद्र, मुंबई यांना जाहीर करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...