आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्लाबोल:भारतीय जनता पक्ष, एनसीबी मुंबईमध्ये दहशत माजवतात, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईडी कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन - Divya Marathi
ईडी कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन

भाजप, एनसीबी आणि काही गुन्हेगार मुंबईत दहशत माजवत असून आपण लवकरच भाजपच्या रॅकेटचा भंडाफोड करणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी केला. तसेच आज ईडी कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवकांनी जोरदार आंदोलन केले.

मलिक म्हणाले, केवळ इलेक्ट्रॉनिक पुराव्यांवर एनसीबी चालत आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा मोबाइल व व्हॉट‌्सॲप संवाद तपासा. हे सर्व सार्वजनिक केले तर एनसीबीच्या कारवाया या फर्जीवाडा कशा आहेत, हे सर्व समोर येईल. रेव्ह पार्टीमध्ये जे संशयित सापडत होते त्यांची रक्त व लघवी नमुन्यासाठी घेऊन संशयितांना सोडले जायचे. नमुना पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले जात होते. मात्र या वर्षभरात एनसीबीने ज्यांच्यावर आरोप लावले किंवा अटक केली त्यांचे कोणतेही रक्त किंवा लघवीचे नमुने घेतलेले नाहीत, असा दावा मलिक यांनी केला. ज्या आरोपींना ताब्यात घेतले जात आहे त्यांचे नमुने पॉझिटिव्ह येणार नसल्याने त्यांची नमुना टेस्ट केली जात नाही, असेही ते म्हणाले.

ईडी कार्यालयासमोर आंदोलन
केंद्र सरकार हमसे डरती है... ईडी को आगे करती है... नारायण राणेंच्या चौकशीचे काय झाले... कृपाशंकरसिंग यांच्या चौकशीचे काय झाले... विजयकुमार गावित यांच्या चौकशीचे काय झाले... बबनराव पाचपुते यांच्या चौकशीचे काय झाले... अशा घोषणा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने ईडी कार्यालयासमोर बुधवारी (२० ऑक्टोबर) आंदोलन केले.

बातम्या आणखी आहेत...