आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचंद्रशेखर बावनकुळे हे आहेत महाराष्ट्राचे मात्र दिसतात वेस्ट इंडीजच्या खेळाडूसारखे, असे म्हणत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे.
भास्कर जाधव म्हणाले, विवियन रिचर्ड मजबूत होता, चंद्रशेखर बावनकुळे पॅट्रिक पॅटरसनसारखा दिसतो का तर नाही, ब्रायन लारसारखो दिसतो का नाही मग तो कोणासारखो दिसतो तर त्यावेळी वेस्ट इंडीजचा खेळाडू अॅम्ब्रोससारखा सारखा तो दिसतो, हे लक्षात आले. जुन्या लोकांना माहित आहे अॅम्ब्रोस कसे होते. नाहीतर बावनकुळे त्यांना रागवायचे.
एका बॉलवर आऊट करतील
भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही वेस्ट इंडीजच्या खेळाडूसारखे दिसतात. मात्र ते खेळाडू होते तुम्ही कोणासोबत खेळताय, उद्धव ठाकरेंबरोबर. उद्धव ठाकरे तुम्हाला एका बॉलवर आऊट करतील पत्ता सुद्धा लागणार नाही. असे म्हणत भास्कर जाधव यांनी बावनकुळेंना उपरोधिक टोला लगावला.
कोण आहे कर्टली ऍम्ब्रोस?
कर्टली ऍल्कॉन लिनवॉल ऍम्ब्रोस हा वेस्ट इंडीजचा खेळाडू आहे. कर्टली अॅम्ब्रोस याने 1988 ते 2000 पर्यंत वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. तो एक वेगवान गोलंदाज आहे. अॅम्ब्रोसने वेस्ट इंडिजसाठी 98 कसोटी आणि 176 एकदिवसीय सामने खेळले. त्याने अनुक्रमे 405 आणि 225 विकेट घेतल्या. त्याच्या कारकिर्दीत बहुतेक वेळा तो ICC खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानी राहिला. आणि त्याची जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून गणना होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.