आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामला एका महिन्याच्या आत जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा खळबळजनक आरोप आज विधानसभेत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला.
तुरुंगात जायला घाबरत नाही
आमदार भास्कर जाधव आज विधानसभेत म्हणाले, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विधानसभेत कठोर शब्दांत टीका केली होती. त्यानंतर लगेच माझ्याकडे चौकशी अधिकारी पाठवण्यात आले. मला एका महिन्याच्या आत जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी तुरुंगात जायला घाबरत नाही. मी तुरुंगात जायला तयार आहे. मात्र, या प्रकरणात माझ्या मुलाचेही नाव गोवण्यात आले आहे.
सुडाचे राजकारण सुरू
आमदार भास्कर जाधव म्हणाले, राज्यात सध्या सुडाचे राजकारण सुरू आहे. या सुडाच्या राजकारणाला आम्ही घाबरत नाही. कारण आम्ही काहीही काळेबेरे केलेले नाही. मात्र, माझ्या कुटुंबाविरोधात काही कारस्थान रचले जात असेल तर माफ करणार नाही, असा इशारा जाधव म्हणाले. तसेच, तपास यंत्रणांचा वापर करुन विरोधकांना नामोहरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आम्ही गुडघे टेकणार नाही.
शिंदे गटाला उद्देशून आमदार भास्कर जाधव म्हणाले, सत्तेचा उन्माद बरा नव्हे. आज तुम्ही आमच्याकडून सत्ता, पक्ष, धनुष्यबाण हिसकावून घेतले आहे. तरीही तुम्ही आम्हाला संपवू शकणार नाहीत. जनतेच्या दरबारात जाऊन आम्ही न्याय मिळवू.
सत्ताधाऱ्यांचा आक्षेप
दरम्यान, आमदार भास्कर जाधवांच्या या आरोपावर सत्ताधारी पक्षातील आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला. आमदार भास्कर जाधव हे सरकारविरोधात नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. विधिमंडळ हे सार्वभौम सभागृह आहे. अशा पद्धतीने बिनबुडाचे आरोप करुन थेट मुख्यमंत्र्यांचे नाव घेणे योग्य नाही. भास्कर जाधवांविरोधात खरेच चौकशी सुरू असेल तर त्यांनी त्यांची सविस्तर माहिती द्यावी. अन्यथा शब्द मागे घ्यावेत, अशी मागणी सत्ताधारी पक्षातील आमदारांनी केली.
हेही वाचा,
नवाब मलिक यांना 50 वेळा देशद्रोही म्हणेल!:हक्कभंग प्रस्तावावरुन एकनाथ शिंदे आक्रमक, ठाकरेंचे प्रत्युत्तर- आरोप सिद्ध झाले नाहीत
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे मुंबईत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दाऊदबरोबर संबंध आहेत. त्यामुळे मलिक हे देशद्रोही आहेत. देशद्रोह्याला देशद्रोही म्हणणे हा गुन्हा असेल तर असा गुन्हा मी पन्नासवेळा करेन, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात ठणकावून सांगितले. यावर नवाब मलिक यांच्याविरोधातील आरोप सिद्ध झाले नाहीत, असे प्रत्युत्तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.