आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदेंचा दसरा नव्हे कचरा मेळावा:''ते म्हणतात तोंड उघडायला लावू नका, त्याचे तोंडच घाण, कशाला उघडता''-भास्कर जाधवांची राणेंवर टीका

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीकेसीत शिंदे गटाचा दसरा मेळावा नाही तर कचरा मेळावा आहे. खुद्दारांचा मेळावा येथे आणि गद्दारांचा मेळावा तेथे होत आहे. तिकडे पन्नास खोके आहेत तर आमचे शिवसैनिक चटणी-भाकर घेऊन मेळाव्याला आले आहेत. ज्या धनुष्यबाणावर निवडून आले त्या चिन्हालाच गोठवण्याचे काम गद्दार करीत असल्याची जहाल टीका शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी केली.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर आज सायंकाळी ते शिवसैनिकांना संबोधित करीत होते.

शिंदे गटाते ते तर पातकच

जाधव म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसवर जरूर टीका केली पण काॅंग्रेसनेही बाळासाहेबांच्या विचारांना रोखले नाही आदरच केला. पण शिंदे गट शिवसेनेला मैदान मिळू नये हे पातकाचे काम तुम्ही करीत होता.

न्यायदेवतेला धन्यवाद

भास्कर जाधव म्हणाले, शिंदे गटाने शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला नाकारले पण मी न्यायदेवतेला धन्यवाद देतो. त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यालाही न्याय दिला. राज्यात सत्ता बदल झाला तेव्हा त्यांनी अनेकांचे आशिर्वाद घेत असल्याचा बहाणा केला.

त्यांनी दगा दिला

जाधव म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी उतारवयात आमच्याकडून वचने घेतली. तुम्ही आमच्या उद्धव, आदित्य यांना सांभाळा असे वचन घेतली, त्यांना तुम्ही दिली पण नंतर दगा दिला. शिंदेशाही नाही तर ती मोगलशाही आहे असे माॅंसाहेब म्हणतात

तो कचरा मेळावा

जाधव म्हणाले, बीकेसीचा दसरा मेळावा नाही तर कचरा मेळावा आहे. खुद्दारांचा मेळावा येथे आणि गद्दारांचा मेळावा तेथे होत आहे. तिकडे पन्नास खोके आहेत तर आमचे शिवसैनिक चटणी-भाकर घेऊन मेळाव्याला आले आहेत. ज्या धनुष्यबाणावर निवडून आले त्या धनुष्यबाणाला गोठवण्याचे काम तुम्ही करीत आहात.

कोंबडीवाल्याचा समाचार घ्यायचाय

​​​​​​​भास्कर जाधव म्हणाले, कोंबडीला दोन टोक असतात, पुढचे एक आणि मागचे एक, तो अकलेचा कांदा आहे. त्याची कुंडली ह्याची कुंडली माझ्याकडे आहे असे सांगतो. तो इनकम टॅक्समध्ये शिपाई होता. तो शिपाईच राहीला. तो म्हणतो तोंड उघडायला लावू नका, त्याचे तोंडच घाण आहे कशाला उघडतो. दोन वेळा ठाकरेंनी तुम्हाला पाडले.

बातम्या आणखी आहेत...