आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री शिंदेंना गुण नाही, पण वाण आला:भास्कर जाधवांची टीका म्हणाले - अब्दल सत्तारांना माफी मागायला लावणे हा देखावा

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपसोबत गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपसारखे नाही, पण गुण नाही पण वाण आला अशी त्यांची स्थिती झाली आहे. त्यांनी अब्दुल सत्तारांना माफी मागायचे सांगितले. पण सत्तारांनी राजीनामा अद्याप दिला नाही त्यामुळे सत्तारांना माफी मागायला लावणे हा देखावा आहे का? असा सवाल भास्कर जाधव यांनी आज माध्यमांसमोर व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांवर जाधवांची टीका

भास्कर जाधव म्हणाले, नवनीत राणा, रवी राणांनी बेताल वक्तव्य केले पण भाजपच्या प्रमुख नेत्यांनी आणि पक्षाने त्यांना थांबवले नाही. भाजप सुस्कृंत लोकांचा पक्ष पार्टी विथ डिफरन्स अशी बिरुदावली भाजप मिरवते पण सत्ता न आल्याने हे सर्व सोडले आहे. एकनाथ शिंदे हे भाजपसारखे नाहीत, पण गुण नाही पण वाण लागला असे शिंदेंना म्हणावे लागेल.

बेताल भाषा

भास्कर जाधव म्हणाले, एकनाथ शिंदेंच्या गटातील लोक काहीही बेताल बोलत आहे. भाजपची भाषाही विसरून चालणार नाही. जे बोलत आहेत, त्यांचे शब्द दिसत असले तरीही त्यामागे भाजपच्या कोणत्या नेत्यांचा हात आहे का हे तपासावे लागेल.

सत्तारांकडून स्वःतची स्तुती

भास्कर जाधव म्हणाले, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार असेच बोलतात. हे ठरवून सुरू आहे. एक डाव आम्ही केला आता तुम्ही काही तरी करा असे चालू आहे. कालचे अब्दुल सत्तारांचे वक्तव्य निषेध व्यक्त करण्यापूर्वी नाही. एकनाथ शिंदे यांनी त्यांना माफी मागितल्याचे सांगितले जाते. पण दुसऱ्या बाजूने तेच सिल्लोडच्या सभेत स्वःतची स्तुती करतात.

राजीनामा अजून नाही

भास्कर जाधव म्हणाले, अब्दुल सत्तारांचा अजूनही राजीनामा आलेला नाही, त्यामुळे त्यांना माफी मागायला लावणे हाही एक देखावा आहे. नवनीत राणा, अनिल बोंडे, कंगना राणावत बघा ज्यांनी भाजपविरोधी नेत्यांना शिव्या घातल्या त्यांना काही न् काही बक्षीस मिळाले आहे, काही न् काही पदे मिळाले आहे.

शेलारांचा चिलीमशी संबंध

भास्कर जाधव म्हणाले, जास्तीत जास्त विरोधी नेत्यांवर टीका केली जाते त्यांना जास्तीत जास्त पदे आणि पदोन्नती दिली जाते. हा ट्रेंड सुरू झाला असून भाजपकडून हा प्रकार सुरू आहे. मशाल क्रांतिचे प्रतीक असून त्याला चिलीम म्हणून आशिष शेलार बोलत असतील तर त्यांचा आणि चिलीमचा जवळचा संबंध आहे.

भाजपला धडा मिळेल

भास्कर जाधव म्हणाले, छोट्या- छोट्या पक्षांची टिंगल टवाळी केली जात नाही, पण आशिष शेलार हे शिवसेनेवर टिंगल टवाळी करतात. परंतु, राज्यातील जनताच त्यांना धडा शिकवेल.

बातम्या आणखी आहेत...