आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा केंद्राचे पुन्हा होणार भूमिपूजन:गुढीपाडव्याला ठाकरेंनी केले होते भूमिपूजन

मुंबई4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मरीन ड्राईव्ह रोडवरील चर्नी रोड परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)च्या सहकार्याने उभारण्यात येणा-या मराठी भाषा भवनाचे काम एक-दोन महिन्यात सुरु होणार असून दोन आठवड्यात भूमीपूजन होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी (ता.२४) दिली. आश्चर्य म्हणजे २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यादिनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमीपूजन केले होते. सामंत यांनी ऐरोली येथील मराठी भाषा भवन उप केंद्राच्या जागेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. सामंत म्हणाले, मुंबईतील चर्नी रोडवर मराठी भाषा भवन जवाहर बाल भवनाच्या मोकळ्या जागेवर उभे राहणार आहे. तर, उपकेंद्र एरोली नवी मुंबई येथे बांधण्यात येणार आहे. मराठी भाषा भवन व मराठी भाषा उपकेंद्रांचे बांधकाम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणार आहे. या दोन्ही ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असून लवकरच कामाला सुरुवात होईल. नवी मुंबईत उभारण्यात येत असलेल्या एरोली येथील उपकेंद्रासाठी मराठी भाषा विभागाने २६ कोटींचा निधी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे सुपूर्द केलेला आहे.

बातम्या आणखी आहेत...