आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Bhushan Kumar Case Update| Bhushan Kumar T Series Alleged Rape Case| Extorsion Case Filed Againts Model And Local Politician News And Updates

भूषण कुमार प्रकरणात ट्विस्ट:टी सिरीजच्या मालकावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या मॉडेलसह स्थानिक नेत्याविरुद्ध पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

टी सिरीजचे भूषण कुमार प्रकरणात यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. मुंबई पोलिसांनी आता आरोप करणाऱ्या तरुणीसह स्थानिक नेता मल्लिकार्जुन पुजारीच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. डी.एन. नगर पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला.

चित्रपट निर्माते आणि टी सिरीजचे मालक भूषण कुमार यांना संबंधित मॉडेल आणि नेत्याने खंडणी मागितली होती. खंडणी दिली नाही तेव्हा त्यांनी पोलिसांत बलात्काराची तक्रार दाखल केली. कुमार यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी या दोघांनी षडयंत्र रचला असे आरोप आता करण्यात आले आहेत. दोघांनी मिळून टी सिरीज आणि भूषण कुमार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला असेही आरोपांत सांगण्यात आले आहे.

जून महिन्यात पहिल्यांदा मागितली होती खंडणी
ठाणे येथील राजकीय नेता मल्लिकार्जुन आणि एका महिला मॉडेलने मिळून भूषण कुमार यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी सापळा रचला होता. जून 2021 मध्ये मल्लिकार्जुन भूषण कुमार यांच्याकडे पैसे मागण्यासाठी गेला होता. पैसे नाही दिल्यास एक तरुणी तुमच्याविरोधात बलात्काराची तक्रार करणार आहे अशी धमकी त्याने कुमार यांना दिली होती. यानंतर 1 जुलै रोजी टी सिरीजच्या वतीने पुजारीच्या विरोधात अंबोळी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.

कृष्णन कुमार यांना बोलावून स्क्रीनशॉट दाखवले
टी सिरीजच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर मल्लिकार्जुन पुजारीने कृष्णन कुमार यांच्याशी संवाद साधला. तसेच 5 जुलै 2021 रोजी एका पंचतारांकित हॉटेलात भेटण्यासाठी बोलावले. ठरलेल्या वेळी कृष्णन कुमार आणि पुजारी यांची भेट झाली. परंतु, या भेटीत पुजारीने पुन्हा भूषण कुमार यांच्याविरुद्ध एक तरुणी बलात्काराची तक्रार करणार असल्याची धमकी दिली. यावेळी त्याने कृष्णन कुमार यांना मेसेजचे काही स्क्रीनशॉट दाखवले. या संभाषणातील मोबाईल क्रमांक भूषण कुमारच नव्हे, तर टी सिरीजच्या कुठल्याही कर्मचाऱ्याचे नव्हते. तरीही पुजारी वारंवार मोठी रक्कम मागत होता. भेट झाल्यानंतर दोघेही परतले. या दरम्यान, कृष्णन कुमार यांनी काहीसे संभाषण रेकॉर्ड केले. त्यामध्ये मल्लिकार्जुन पुजारी पैशांची मागणी करताना आणि धमक्या देताना ऐकायला येत होता.

डाळ शिजत नसल्याचे पाहून दिली तक्रार
मल्लिकार्जुन पुजारीने कृष्णन कुमार यांच्याकडून पैसे उकळण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. शेवटी जेव्हा आपल्याला काहीच मिळणार नाही असे पुजारीच्या लक्षात आले, तेव्हा 15 जुलै रोजी त्याने एका तरुणीसोबत अंधेरी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. सर्वच माध्यमांवर भूषण कुमार यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त झळकले.

रेकॉर्डिंग दाखवून केला गुन्हा दाखल
यानंतर कृष्णन कुमार यांनी 16 जुलै रोजी अंबोळी पोलिस स्टेशन गाठून मल्लिकार्जुन पुजारीचे रेकॉर्डिंग पोलिसांना ऐकवले. याच आधारे अंबोळी पोलिसांनी 16 जुलै रोजी मल्लिकार्जुन आणि संबंधित महिला मॉडेलच्या विरोधात कलम 386, कलम 500, कलम 506 आणि कलम 506(2) अंतर्गत बलात्काराचे खोटे आरोप लावून खंडणी वसूल करण्याचे षडयंत्र रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिस आता या प्रकरणात सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...