आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) आयपीओच्या पहिल्याच दिवशी बुधवारी सायंकाळपर्यंत ६७% शाेअर्ससाठी बाेली लावली गेली. सुरुवातीच्या दिवशी बोली लावणाऱ्यांत एलआयसीचे विमाधारक पुढे राहिले. विमाधारकांनी आपल्या आरक्षित शेअरच्या १.९९ पट शेअर्ससाठी बोली लावली. कर्मचाऱ्यांचा राखीव हिस्सा ११७% सबस्क्राइब झाला, तर किरकोळ गुंतवणूकदारांनी ६०%, क्वालिफाइड इन्स्टिट्युशनल बायर्सनी ३३%, नॉन इन्स्टिट्युशनल गुंतवणूकदारांनी २७% शेअर्ससाठी बोली सादर केल्या. सरकारला एलआयसीच्या आयपीओतून २१ हजार कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. ते देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीतील आपला ३.५% हिस्सेदारी विकत आहे. आयपीओसाठी प्राइझ बँड ९०२ ते ९४९ रुपये प्रतिशेअर निश्चित करण्यात आला आहे.
सर्वात मोठा आयपीओ
एलआयसीचा आयपीओ हा भारतातील आजवरचा सर्वात मोठा आयपीओ ठरला आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०२१ मध्ये पेटीएमचा सर्वात मोठा आयपीओ आला होता. त्याचे प्राइझ बँड २,०८० ते २,१५० होते. हा आयपीओ १८,३०० कोटी रुपयांचा होता. त्याचे सबस्क्रिप्शन १.८९ पटीने झाले होते. मात्र, पेटीएमला एलआयसीने मागे टाकले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.