आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-लिलाव:आयपीएल माध्यम हक्कांसाठीची बोली 43 हजार कोटी रुपयांवर, चार विशेष पॅकेजअंतर्गत लिलावाचे आयोजन

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) टीव्ही आणि डिजिटल अधिकारांचे एकूण मूल्य ई-लिलावाच्या पहिल्या दिवशी ४३ हजार कोटींच्या पुढे जाऊन ४३,०५० कोटी रुपयांवर गेले आहे. ते २०१७ मध्ये स्टार इंडियाकडून दिल्या गेलेल्या किमतीपेक्षा २.६३ पट अधिक आहे. त्या वेळी स्टार इंडियाने १६,३४७.५ रुपये देऊन हे प्रसारण अधिकार मिळवले होते.

रविवार हा दोनदिवसीय ई-लिलावाचा पहिला दिवस होता. आयपीएलअंतर्गत पाच वर्षांत प्रतिहंगाम ७४ सामने खेळले जाणार आहेत. शेवटच्या दोन वर्षांत सामन्यांची संख्या ९४ पर्यंत वाढवायची तरतूद आहे. या सामन्यांच्या प्रसारणाचे अधिकार विकण्यासाठी चार विशेष पॅकेजअंतर्गत ई-लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे. बीसीआयने बंद बोली मागवण्याची दीर्घकाळापासून सुरू असलेली परंपरा थांबवून पहिल्यांदा ई-लिलावाचा पर्याय निवडला आहे. लिलावाची प्रक्रिया रविवारी सकाळी ११ वाजता सुरू झाली. गेल्या दोन महिन्यांपेक्षा कमी काळात एकूण १२ कंपन्यांनी बोलीसाठीच्या अर्जांची खरेदी केली होती.

बातम्या आणखी आहेत...