आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Big B Corona Positive | A Team Of BMC Arrives At Jalsa Bungalow For Investigation And Sanitization, Here Are Quarantine Jaya Bachchan And Aishwarya Bachchan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बी कोरोना पॉझिटिव्ह:नवीन टेस्टमध्ये ऐश्वर्या आणि आराध्याही पॉझिटिव्ह, फक्त जया यांचा रिपोर्ट निगेटिव्ह, तीनही बंगले सॅनिटाइज करण्यात आले

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रतीक्षा आणि जनक बंगल्यांना देखील सॅनिटाइज केले जाणार

अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर करण्यात आलेल्या एका नवीन टेस्टमध्ये ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्याचेही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. यापूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले होते की, रॅपिड टेस्टमध्ये तीनही रिपोर्ट निगेटिव्ह आले होते परंतु नंतर करण्यात आलेल्या टेस्टमध्ये रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून सामान्य लक्षण सांगण्यात आले आहेत.

कुठून आला नवीन रिपोर्ट
 
मीडिया रिपोर्टनुसार, शनिवारी संपूर्ण कुटुंबाची तीन वेळेस टेस्ट करण्यात आली. तिसरा टेस्ट रिपोर्ट एका प्रायव्हेट लॅबचा असून त्यानंतर बीएमसीचे असिस्टंट कमिश्नर विश्वास मोटे यांनी या मोठ्या अपडेटची पुष्टी केली आहे. ऐश्वर्या आणि आराध्या यांनाही नानावटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले जाऊ शकते. जया बच्चन घरातच क्वारंटाइन राहतील. याव्यतिरिक्त अमिताभ यांची मुलगी श्वेता नंदा, मुलगा अगस्त्य नंदा आणि मुलगी नव्या नवेली नंदा यांचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे.

तत्पूर्वी सकाळी महापालिकेच्या टीमने अमिताभ यांच्या जलसा बंगल्याव्यतिरिक्त जनक आणि प्रतीक्षा बंगला देखील सॅनिटाइज केला आहे. जलसा बंगल्याशेजारी बंगल्यांमधील रहिवाशांची देखील स्क्रीनिंग करण्यात आली आहे. 

जलसा बंगला प्रतिबंधित क्षेत्र घोषित 

तपासणीनंतर बंगला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. याबाबच एक पोस्टर देखील गेटवर लावले आहे. यानंतर कोणत्याही व्यक्तीला पुढील आदेशापर्यंत बंगल्यात प्रवेश मिळणार नाही. 

अमिताभ आणि अभिषेकचा आरटी-पीईसीआर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला

अमिताभ आणि अभिषेक यांचा आरटी-पीईसीआर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांच्या स्टाफ आणि परिवारातील इतर लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. दरम्यान यांच्या नावांचा खुलासा झाला नाही. 

काय आहे आरटी-पीईसीआर टेस्ट?

भारतात कोविड-19च्या चाचणीसीठी आरटी-पीईसीआर आणि रॅपिड अँटीबॉडीज अशा दोन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. आरटी-पीईसीआर टेस्ट म्हणजे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेझ चेन रिअॅक्शन टेस्ट. हे एक लॅब टेक्निक आहे ज्यामध्ये आरएनएच्या डीएनएमध्ये रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन जोडून व्हायरसबद्दल समजते. दुसरे - अँटीबॉडीज टेस्टमध्ये रक्ताचा वापर होते. ज्याद्वारे व्हायरस प्रति शरीराच्या प्रतियेबद्दल माहिती होते. 

बातम्या आणखी आहेत...