आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनलॉक:ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; 8 जुलैपासून हॉटेल्स, गेस्ट हाउस आणि रेस्तरॉ उघडण्यास परवानगी

मुंबई2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • लो एसी, प्रत्येक ग्राहकची थर्मल स्क्रीनिंग आणि डिजिटल पेमेंट बंधनकारक

राज्यात कोरोनाचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान मिशन बिगीन अगेनमध्ये राज्यात उद्योग व्यवसाय सुरू करण्यात येत आहेत. महाराष्ट्रात हॉटेल आणि लॉज सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. येत्या 8 जुलैपासून हॉटेल आणि लॉज सुरु केले जाणार आहेत. नुकतेच मुख्य सचिव यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. मात्र कंटेन्मेंट झोनमध्ये सध्या तरी हॉटेल आणि लॉज सुरु करता येणार नाही.

राज्यात मुंबई, पुण्यासारख्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहेत. अनेक परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत. त्यानुसार ज्या परिसरामध्ये जास्त रुग्ण आहेत आणि जो परिसर कन्टेनमेंट झोनमध्ये येतो अशा ठिकाणी हॉटेल्सला सुरू करण्यासाठी परवानगी नसणार आहे.  8 जुलैपासून हॉटेल्स सुरू करण्यात येणार आहेत. 

मुख्य सचिवांकडून जारी केलेल्या आदेशानुसार, जर या संस्था क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरात असतील. तर महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाच्या पुढील आदेशापर्यंत त्या क्वारंटाईन सुविधेसाठीच वापरण्यात येणार आहेत. किंवा त्यांचा उर्वरित भाग (67 टक्के) महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाकडून क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरला जाऊ शकतो, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

हे आहेत नवीन नियम

 • हॉटेल कंटेनमेंट झोनच्या बाहेर असावे, फक्त 33 टक्के ग्राहकांना परवानगी.
 • लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच येऊ दिले जाईल, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना मास्क घालणे अनिवार्य.
 • सर्व ग्राहकांची थर्मल स्क्रीनिंग केली जाईल आणि सॅनेटाइजरची व्यवस्था कारावी लागेल.
 • हॉटेल्स आणि रेस्टरॉमध्ये व्हिडिओ संदेशाद्वारे कोरोनाची माहिती द्यावी लागेल.
 • हॉटेलमध्ये थांबलेले ग्राहक स्विमिंग पूल, जिम आणि क्लब हाउसचा वापर करू शकणार नाहीत.
 • पेमेंट करण्यासाठी क्यूआर कोड, डिजिटल माध्यम आणि विना टच कार्ड पेमेंट सिस्टीम ठेवणे बंधनकारक.
 • सर्वांना सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे लागेल.
 • एअरकंडीशनला 24 ते 30 डिग्री सेल्सियसदरम्यान ठेवावे लागेल. तसेच ह्यूमिडिटी 40-70% असावी.
 • गेस्टकडे आरोग्य सेतू अॅप असावे.
बातम्या आणखी आहेत...