आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच:खासगी रुग्णालयात उपचारासाठी कोर्टाने परवानगी नाकारली, उपचार जे.जे. रुग्णालयातच होणार

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही. खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देशमुखांनी मागीतली होती. मात्र न्यायालयाने देशमुखांच्या अर्जावर सुनावणी वेळी त्यांना परवानगी नाकारली आहे. कोर्टाने परवानगी नाकारल्यानंतर आता देशमुखांवर जे.जे रुग्णालयात उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. उपचारावेळी त्यांच्याजवळ थांबणाऱ्या व्यक्तिचे नाव कोर्टाला देण्यात यावे असेही सांगण्यात आले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
100 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांची आर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान कोठडीत असताना अनिल देशमुख यांच्या खाद्याला दुखापत झाली आहे.

त्यामुळे देशमुखांनी खांद्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. मात्र ईडीने देशमुखांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी खाजगी रुग्णालयात करण्याची परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी कोर्टाकडे केली होती. तर जे.जे. रुग्णालयात ही शस्त्रक्रिया होऊ शकते असे म्हणत ईडीने देशमुखांवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यास विरोध केला होता.

चांदीवाल आयोगाच्या अहवालात देशमुखांना क्लीनचिट?
मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता. या प्रकरणी राज्य सरकारने चांदिवाल आयोगाची स्थापना केली होती. या आयोगामार्फत या प्रकरणातील सर्व अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

20 मार्च 2021 या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी वसूली आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपाने राज्यात एकच खळबळ उडाली होती. यानंतर देशमुखांना

बातम्या आणखी आहेत...