आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडलिंगपासून बॉलिवूडपर्यंत:बिग बॉस-13 चा विजेता सिद्धार्थ शुक्लाने मॉडलिंगपासून केली होती करिअरची सुरुवात, 'हंप्टी शर्मा की दुल्हनिया' मधून केला होता बॉलिवूड डेब्यू

21 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • सिद्धार्थने 2005 मध्ये मॉडेलिंगद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

बिग बॉस सीझन -13 चे विजेता सिद्धार्थ शुक्लाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. तो 40 वर्षांचा होता. सांगितले जात आहे की बुधवारी रात्री प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याने झोपायच्या आधी काही औषधे घेतली होती. सिद्धार्थने 2005 मध्ये मॉडेलिंगद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

मुंबईत जन्मलेल्या सिद्धार्थने इंटिरियर डिझाईनचा अभ्यास केल्यानंतर 2004 मध्ये 'ग्लॅड्रॅग्स मॅनहंट मेगामोडेल कॉन्टेस्ट' मध्ये भाग घेतला आणि त्यात तो रनर-अप होता, त्यानंतर त्याने म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले, हे गाणे 'इला अरुण' या गायकाने गायले होते .

2005 मध्ये, सिद्धार्थने तुर्कीमध्ये आयोजित वर्ल्ड बेस्ट मॉडल कॉन्टेस्ट स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि जिंकले. या स्पर्धेत तो जेतेपद जिंकणारा पहिला भारतीय आशियाई मॉडेल बनला. या विजयानंतर त्याला बजाज अॅव्हेंजर, ICICI आणि digjam च्या जाहिराती मिळाल्या.

सिद्धार्थचा टेलिव्हिजन प्रवास

 • सिद्धार्थने 2008 मध्ये सोनी टीव्हीच्या 'बाबुल का अंगना छूटे ना' मालिकेतून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले, ज्यामध्ये तो आस्था चौधरीसोबत 'शुभ रणौत' या व्यक्तिरेखेमध्ये दिसला.
 • 2009 मध्ये सिद्धार्थ 'जाने पहचाने' या मालिकेत दिसला, त्याच वर्षी तो 'आहत' या मालिकेच्या काही भागांमध्येही दिसला.
 • 2011 मध्ये सिद्धार्थ 'लव्ह यू जिंदगी' या मालिकेत राहुल कश्यपच्या भूमिकेत दिसला. ही मालिका बॉलीवूड चित्रपट 'जब वी मेट' पासून प्रेरित होती.
 • 2012 मध्ये सिद्धार्थ 'बालिका वधू' या मालिकेत जिल्हाधिकारी शिवराज शेखरच्या भूमिकेत दिसला होता. सिद्धार्थला या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. त्यांना 'शिव' या व्यक्तिरेखेसाठी इंडियन टेलिव्हिजन अकादमीचा ग्रेट परफॉर्मर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला.

रिअॅलिटी शोमध्ये सिद्धार्थचा प्रवास

 • 2013 मध्ये, सिद्धार्थ 'झलक दिखला जा' च्या 6 व्या सीझनमध्ये सहभागी झाला होता. 2015 मध्ये, सिद्धार्थने भारती सिंगसोबत 'इंडियाज गॉट टॅलेंट 6' होस्ट केले.
 • 2016 मध्ये 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 7' मध्ये भाग घेतला आणि विजेता ठरला.
 • 2019 मध्ये, तो 'बिग बॉस 13' शोमध्ये आला, जो टीव्हीचा सर्वात मोठा रिअॅलिटी शो मानला जातो आणि या शोचा विजेता बनला.

सिद्धार्थ मोठ्या पडद्यावर

 • सिद्धार्थने 2014 मध्ये धर्मा प्रॉडक्शन निर्मित 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. फिल्मफेअरने त्याला या वर्षी 2014 चा 'बेस्ट डेब्यू अॅक्टर मेल' पुरस्कार दिला.
 • 2016 मध्ये त्याने 'बिझनेस इन ऋतु बाजार' या चित्रपटात काम केले हा कझाकस्तानी चित्रपट होते.

डिजिटल पदार्पण
2021 मध्ये त्याने 'ब्रोकन बट ब्यूटीफुल 3' सीझनसह डिजिटल पदार्पण केले.

बातम्या आणखी आहेत...