आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बिहार विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहेत. निवडणुकांच्या मतदानाला अगदी काहीच आठवले शिल्लक आहेत. दरम्यान शिवसेनाही बिहार निवडणुकांच्या मैदानात उतरली आहे. यंदा शिवसेना बिहार निवडणुकांध्ये 50 जागा लढवणार आहे. आता शिवसेनेने बिहार निवडणुकांसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासोबतच 20 जणांचा समावेश आहे.
नुकतीच शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे ही यादी सोपवली आहे. शिवसेनेने जाहीर केलेल्या या यादीतील सर्व नेते निवडणुकांच्या प्रचारसभेत सहभागी होणार आहे. बिहार निवडणुकीत शिवसेना 50 जागांवर निवडणूक लढवणार आहे. असे असले तरीही त्यांना धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवता येणार नाही.
शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची नावे
तीन टप्प्यात होणार निवडणुका
बिहार विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्याचे मतदान 28 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 3 तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यासोबतच निवडणुकांचे निकाल 10 नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. याव्यतिरिक्त कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर यावेळी मतदारांना एका तासाचा अधिक कालावधी वाढवण्यात आला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.