आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेखाजोखा:देशात कोट्यधीश अन् संपत्तीही वाढली; मात्र वर्षात आनंद घटला, हुरुन इंडियाचा संपत्ती अहवाल 2021

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीमंतांच्या श्रीमंतीचा लेखाजोखा ठेवणाऱ्या “हुरुन इंडिया’ने देशातील मिलियनेयर्सचा वेल्थ रिपोर्ट जारी केला आहे. त्यानुसार २०२१ मध्ये देशात कमीत कमी एक दशलक्ष डॉलर (सुमारे ७ कोटी रु.) संपत्तीच्या घराण्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत ११% वाढून ४.५८ लाख झाली आहे. मालमत्ता वाढल्यानंतरही कोट्यधीशांचा आनंद घटल्याची बाब पाहणीतून समोर आली. त्यांचा हॅपिनेस इंडेक्स २०२१ मध्ये ६६% राहिला, २०२० मध्ये तो ७२% होता. म्हणजे, ६% जास्त लोक वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात समाधानी होते.

दोन तृतीयांश मुलांना परदेशात शिकवू इच्छितात
- येत्या ५ वर्षांपर्यंत दशलक्ष डॉलर संपत्तीच्या घराण्यांची संख्या ६ लाख होईल.
- ७ कोटींपेक्षा जास्त संपत्तीची सर्वाधिक २०,३०० घराणी मुंबईत आहेत. दिल्लीत १७,४००, कोलकात्यात १०,५०० आहेत.
- ३६% मिलियनेयर्स एनईएफटी वा आरटीजीएसऐवजी ई-वॉलेट किंवा यूपीआयद्वारे पैशाची देवाण-घेवाण करतात. गेल्या वर्षी ही संख्या १८% होती.

- गुंतवणुकीसाठी पहिली पसंत शेअर बाजार,नंतर रिअल इस्टेट. - दोन तृतीयांश लोक मुलांना विदेशात शिकवू इच्छितात.

३५० वर सर्व्हे, यात ४२ सुपर रिच : हुरुनने ३५० मिलियनेयर्सचे सर्वेक्षण केले. त्यात ४२ सुपर रिच असून त्यांची मालमत्ता १०० कोटी रु. आहे. ३०% गुंतवणुकीच्या जोखमीपासून वाचण्याच्या धोरणावर चालतात.

बातम्या आणखी आहेत...