आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंगल्यांची डागडुजी:मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यावधींचा खर्च? धनंजय मुंडे म्हणतात चित्रकूट बंगल्यावर अद्याप एक रुपयाही खर्च नाही

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सतेज पाटील म्हणतात - विरोधकांना मुद्दे नसल्याने बंगले दुरुस्तीचे राजकारण

मंत्र्यांच्या बंगल्यांच्या डागडुजीचा विषय सध्या चर्चेत आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे. मात्र असे असताना मंत्र्यांचे बंगले आणि मंत्रालयातील दालनांवर कोट्यावधींची उधळपट्टी केली जात असल्याचे बोलले जात आहे. यावर आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर तीन कोटी 89 लाख रुपये खर्च झाल्याचा उल्लेख आहे. यावर धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 'मला मिळालेल्या चित्रकूट या निवासस्थानावर तीन कोटी रुपये खर्च केल्याचेही सांगण्यात येत आहे. मला या निवासस्थानाचा ताबा मिळून केवळ 8 दिवस झाले असून मी तेथे अद्याप एक रुपयाचा खर्च केला नाही.' धनंजय मुंडेंनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.

विरोधकांकडे मुद्दे नसल्याने बंगले दुरुस्तीचे राजकारण
विरोधकांकडे मुद्दे नसल्याने बंगले दुरुस्तीचे राजकारण केले जातेय असे सतेज पाटील म्हणाले आहेत. मुळात मंत्र्यांचे बंगले हे जुने आहेत. मुंबईचे हवामान पाहता थोडाफार खर्च करावा लागतो. पण तो जास्त झाला हे म्हणणे अयोग्य ठरेल. त्या ठिकाणची व्यवस्था तिथे येणाऱ्या जनतेसाठी असते. आल्यावर तिथे किमान उभे राहता आले पाहिजे आणि बसता आले पाहिजे यासाठी ही व्यवस्था आहे. असेही सतेज पाटील म्हणाले आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser