आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहवाल:राज्याला आता बर्ड फ्लूचा ‘ताप’, ​​​​​​​परभणी-ठाण्यातील पक्षी, कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • परभणी जिल्ह्यात ५५०० कोंबड्यांची कत्तल करणार, १० राज्यांमध्ये फैलाव

देशातील १० राज्यांत बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याचे केंद्र सरकारने सोमवारी जाहीर केले. सोमवारी दिल्ली, उत्तराखंडसह महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून परभणीत ८४३ कोंबड्या, ठाण्यात १५ बगळे, रत्नागिरीत ९ तर बीड येथील ११ कावळ्यांचा अहवाल मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल भोपाळ येथील अायसीएआर प्रयोगशाळेने दिला आहे, अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

बर्ड फ्लूसंदर्भात राज्यातील परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानातील समिती सभागृहात घेतला. या वेळी पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते. या वेळी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बर्ड फ्लू संक्रमण आणि घ्यावयाची काळजी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. या रोगाचे तत्काळ निदान होण्याकरिता पशुसंवर्धन विभागासाठी जैव सुरक्षा स्तर ३ ही प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. दरम्यान, बर्ड फ्लूच्या संकटामुळे कोंबड्यांची मागणी २० टक्के घटली आहे. दरातही घट झाली असून ९० रुपये घाऊक दराने मिळणारी कोबंडी ६५ रुपये किलोवर आली असल्याचे नाशिकच्या आनंद अॅग्रोचे अध्यक्ष उद्धव अहिरे यांनी सांगितले.

मराठवाड्यात परभणी, बीड, नांदेडात शिरकाव
परभणी तालुक्यात ८०० काेंबड्या बर्ड फ्लूमुळे दगावल्या आहेत. सेलू तालुक्यातील कुपटा गावातदेखील ४२६ कोंबड्या मृत आढळल्या. मुरुंबा गावातील ५५०० काेंबड्या नष्ट केल्या जाणार असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले.

काय आहे बर्ड फ्लू

बर्ड फ्लू हा विषाणुजन्य आजार आहे. यात एच ५ एन १ असे टप्पे आहेत. तो संसर्गातून पसरतो. याची लागण होताच पक्ष्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. यावर पक्षी नष्ट करणे हाच पर्याय आहे. माणसालाही लागण झाल्यास त्यांनाही श्वास घेण्यास त्रास, खोकला होतो.

ही घ्या काळजी

  • पक्ष्यांजवळ जाऊ नये
  • घरातील पक्ष्यांना (कोंबडी, कबूतर आदी) बाहेर न सोडता जागेवरच त्यांना खाद्य, पाणी द्यावे
  • शंभर डिग्री तापमानात शिजवलेले मांस सुरक्षित मानले जाते
  • पोट्री फार्ममध्ये कुणालाही प्रवेश देऊ नये

( नांदेड जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी अरविंद गायकवाड यांची माहिती)

दिव्य मराठी एक्स्पर्ट : डॉ. नितीन मार्कंडेय

घाबरू नका! वीस वर्षांत १ हजारपेक्षा कमी माणसांना बर्ड फ्लूची लागण

नांदेड | राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून याचा प्रसार हाेण्याची भीती व्यक्त हाेत असताना पक्ष्यांपासून माणसापर्यंत हा अाजार पसरण्याचे प्रमाण अत्यल्प अाहे. गेल्या वीस वर्षांत एक हजारपेक्षा कमी जणांना याची लागण झाली. परभणी जिल्ह्यातील मुरुंबा येथील बर्ड फ्लूसुद्धा नियंत्रणात येईल. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नसल्याचे मत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय यांनी व्यक्त केले.

७० अंश तापमानावर चिकन, अंडी शिजवा

या राज्यांत फैलाव : राजस्थान, केरळ, गुजरात, हरियाणा, यूपी , हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, उत्तराखंड.

धोका कुणाला

एच ५ एन १ दीर्घकाळ जिवंत राहणारा विषाणू आहे. हा विषाणू संक्रमित पक्ष्यांच्या मल आणि लाळेत दहा दिवस जिवंत राहतो. दूषित पृष्ठभागाला स्पर्श केल्याने या आजाराचे संक्रमण पसरते. पोल्ट्रीशी संबंधित नागरिकांमध्ये या आजाराचा प्रसार होण्याचा उच्च धोका असतो.

राज्यात दररोज १४ कोटींची उलाढाल

राज्यात महिन्याकाठी सुमारे चार कोटी कोंबड्यांचे उत्पादन घेतले जाते. त्यापैकी निम्म्याहून अधिक उत्पादन हे नाशिक व धुळे जिल्ह्यात घेतले जाते. राज्यात पोल्ट्री उद्योगाची रोजची सरासरी उलाढाल ही १४ ते १५ कोटींच्या दरम्यान असल्याची माहिती वेट्स इन पोल्ट्री संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संघटक डाॅ. मोहन गिरी यांनी दिली.

{बीड जिल्ह्यात पाटाेदा तालुक्यात ६ जानेवारीपासून ११ कावळे मृतावस्थेत सापडले होते. यापैकी तीन कावळ्यांचा अहवाल बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आला.

{नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर तालुक्यात चिंचार्डी गावात शेकडो कोंबड्या मृत झाल्या आहेत.

२८ वेळेस राज्यात ‘बर्ड फ्लू’ची साथ. सन २००६ मध्ये सर्वप्रथम नवापुरात शिरकाव

सध्या आलेला बर्ड फ्लू २००६ पेक्षा वेगळा आहे. त्यामुळे पोल्ट्री मालकांनी माहिती लपवू नये. चिकन, अंडी किमान ७० अंश सेल्सियस तापमानावर शिजवून खाण्यास काहीही हरकत नाही, असे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...