आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

भाजपचे आंदोलन:मुख्यमंत्री साहेब दूध घ्या अन् दुधाला भाव द्या; दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी भाजप करणार आंदोलन, किसान मोर्चा अध्यक्षांची घोषणा

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या आंदोलनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या आरोग्यासाठी दूध पाठवणार आहे
Advertisement
Advertisement

लॉकडाउनमध्ये फटका बसलेल्या दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी  राज्य सरकारतर्फे कोणतीही दखल घेण्यात आली नाही. दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजप आक्रमक झाली असून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार आहे. भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी या आंदोलनाची घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना दुध पाठवण्यात येणार आहे.

1 ऑगस्ट रोजी होणार आंदोलन 

राज्यातील दूध उत्पादकांना प्रति लीटर 10 रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी भाजपकडून 1 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी ही घोषणा केली. या आंदोलनात भाजपचे सहकारी पक्ष रयत क्रांती संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्रामचा देखील समावेश असेल. बोंडे म्हणाले की, या आंदोलनावेळी तहसीलदारांद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या आरोग्य सुधारणेसाठी दूध पाठवणार आहे. बोंडे यांनी या आंदोलनासाठी 'मुख्यमंत्री साहेब दूध घ्या अन् दुधाला भाव द्या''चा नारा दिला आहे. 

Advertisement
0