आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा आरोप:मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी एसआरए सोसायटीतील फ्लॅट बळकावल्याचा भाजपचा गंभीर आरोप

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत हे आरोप केले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट प्रकरणावरुन राज्यातील राजकीय वातावरण सध्या तापलेले दिसत आहे. बीएमसीने कंगना रनोटच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर मुंबईतील अनेक अनधिकृत बांधकाम भाजपकडून समोर आणली जात आहेत. आज तर भाजपने मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांच्यावर एसआरए सोसाटीतील फ्लॅट बळकावल्याचा आरोप केला आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत हे आरोप केले आहेत. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'वरळीतील गोमाता एसआरए सोसायटीच्या इमारत क्रमांक 2 मधील रहिवासी फ्लॅट आणि इमारत क्रमांक 1 मधील कार्यालय (केआयएस कॉर्पोरेशन सर्व्हिसेस) हे महापौर किशोरी पेडणेकरांनी बळकावलेले आहे.' असा आरोप मुंबईच्या महापौरांवर करण्यात आला आहे.

पुढे सोमय्यांनी लिहिले की, 'हा फ्लॅट झोपडपट्टी पुनर्वसनाखाली एका व्यक्तीला देण्यात आले होते. तर हे ऑफिस गोमाता एसआरए हाऊसिंग सोसायटीला देण्यात आलेले होते. आता प्रकल्प मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली येतो' असे सोमय्यां म्हणाले आहेत. त्यांनी या ट्विटमध्ये कागदपत्रेही शेअर केली आहेत.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कंगना रनोटमुळे राज्यातील वातावरण तापलेले आहे. भाजपकडून शिवसेनेवर सातत्याने आरोप केले जात आहेत. कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर दोन दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेनं हतोडा चालवला होता. मात्र यानंतर शिवसेनेला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला. दरम्यान शिवसेनेचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून मुंबई महापालिकेचा असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊतांनी म्हटलं होतं.

बातम्या आणखी आहेत...