आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेट्रो कारशेड प्रकल्प:'मुंबईकरांच्या प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा', आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेलारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.

कांजूरमार्ग येथे होत असलेल्या मुंबईमेट्रोच्या कारशेडला स्थगिती देण्यात आली आहे. यानंतर शिवसेनेवर भाजपकडून मोठ्याप्रमाणात टीका केली जात आहे. मुंबई हायकोर्टाने कांजूरमार्ग येथील कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याने महाविकास आघाडी सरकारला धक्का बसला आहे. यावरुन भाजप सातत्याने सरकारवर टीका करत आहे. भाजप नेते आशिष शेलारांनीही ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

'मेट्रोला गिरगावात विरोध केला, मग समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, वाढवण बंदर एवढेच नव्हे तर मुंबई-दिल्ली कॉरिडॉर..प्रत्येक विकास प्रकल्पाला फक्त विरोध, विरोध आणि विरोधच! आता मेट्रो कारशेड उभारण्या पेक्षा या कारशेडला बीकेसीतील जागा निवडून बुलेट ट्रेन होऊच नये असा डाव आखला जातोय.' असा आरोप आशिष शेलारांनी महाविकास आघाडी सरकावर केला आहे.

यासोबतच शेलारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. 'मुंबईकरांच्या प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा आहे. वैयक्तिक अहंकारातून मुंबईच्या विकास प्रकल्पांचा गळा घोटला! हे विरोधक? नव्हे हे तर मुंबईच्या विकासातील गतिरोधक!!' असे म्हणत शेलारांनी ठाकरे पिता-पुत्रांवर निशाणा साधला आहे.

बातम्या आणखी आहेत...