आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपचे टीकास्त्र:अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत? 'युवराजला' वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय? आशिष शेलारांचा राऊतांसह ठाकरे कुटुंबावर निशाणा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अन्वय नाईक यांना न्याय मिळायलाच हवा, पण एक मराठी कुटुंब उभे करुन तुम्ही रिया चक्रवर्तीला का वाचवताय?

अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर राज्यामध्ये नवीन वाद सुरू झाला आहे. भाजपने राज्य सरकारविरोधा आक्रमक भुमिका घेतल्याचे पाहालाय मिळतेय. यावरुन शिवसेनेच्या सामना अग्रलेखातून भाजपचा समाचार घेण्यात आला होता. याच प्रकरणावरून भाजपाने आता सामनाचे कार्यकारी संपादक व शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत राऊत यांच्यासह आदित्य ठाकरे व मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यावरही टीका केली आहे.

आशिष शेलारांनी ट्विट करत अनेक मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली. ते म्हणाले की, 'रोज अस्मितेची ढाल काढून त्यामागे लपणे तुम्ही आधी थांबवा! अन्वय नाईक यांना न्याय मिळायलाच हवा, पण एक मराठी कुटुंब उभे करुन तुम्ही रिया चक्रवर्तीला का वाचवताय? एका मराठी कुटुंबाची ढाल करुन "दिशा सालीयन" बाबत बोलणाऱ्यांची तोंड का बंद करताय? बात और भी निकलेगी...' असे शेलार म्हणाले आहेत.

शेलार यांनी ट्विट करत पुढे म्हणाले की, 'त्यावेळी आमच्या महाराष्ट्र पोलीसांनी केलेला तपास आणि संपूर्ण पोलीस दल यांना खोटे ठरवून आता एका "सिंह" यांना "परमवीर" का देताय? खरी नौटंकी तर हीच आहे. एका "युवराजला" वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय? पत्रपंडित हो,अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत?' असे म्हणत संजय राऊतांवरही निशाणा साधण्यात आला आहे.