आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपचा शिवसेनेवर निशाणा:'गल्लीत नुसताच गोंधळ आणि दिल्लीत सावळा गोंधळ!' कृषि विधेयकावरील शिवसेनेच्या भूमिकेवरुन भाजपचा खोचक टोला

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी व कृषी सेवा करार ही दोन विधेयके रविवारी राज्यसभेत मंजूर झाली

संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात केंद्र सरकारने कृषि क्षेत्राशीसंबंधीत तीन विधेयक मांडली आहेत. यामधील दोन विधेयक दोन्हीही संभागृहात मंजूर झाली. एक विधेयक लोकसभेत मंजूर झालं असून, राज्यसभेत पारित व्हायचं आहे. दरम्यान या विधेयकासंदर्भात शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकेवरून भाजपाने शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेने लोकसभेत या विधेयकासंदर्भात वेगळी भूमिका मांडली आणि राज्यसभेत वेगळी भूमिका मांडली यावरुन भाजपने हा टोला लगावला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत लिहिले की, 'शिवसेनेने सीएएचे लोकसभेत समर्थन आणि यू-टर्न घेऊन राज्यसभेत विरोध केला होता. आता कृषी विधेयकालाही लोकसभेत पाठींबा आणि राज्यसभेत विरोधात भाषण करुन सभात्याग. म्हणजे महापालिकेच्या स्थायी समितीपासून संसद भवना पर्यंत "सेम टू शेम!" गल्लीत नुसताच गोंधळ आणि दिल्लीत सावळा गोंधळ!' असे म्हणत शिवसेनेवर टीका केली आहे.

शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी व कृषी सेवा करार ही दोन विधेयके रविवारी राज्यसभेत मंजूर झाली. दरम्यान प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. यावेळी लोकसभेत शिवसेनेने कृषि संबंधित विधेयकाला पाठिंबा दर्शवला. मात्र राज्यसभेत शवसेना खासदार संजय राऊतांनी कृषिविधेयकावर विरोधी भूमिका मांडत भाषण केले होते. यावरुन भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला.

बातम्या आणखी आहेत...