आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा निशाणा:'भ्रष्टाचारी काँग्रेससोबत सलगी केलेल्या 'जंगलराज का युवराज'ला बिहारच्या जनतेने नाकारले', भाजपचा शिवसेनेसह काँग्रेसवर निशाणा

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भ्रष्टाचारी काँग्रेससोबत 'जंगलाचे बेगडी प्रेमी युवराज' युती करुन बसलेत

बिहार विधानसभा निवडणुकींचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपाला 74 तर जेडीयूला अवघ्या 43 जागांवर समाधान मानावे लागले. यानिवडणुकीमध्ये काँग्रेस-राजद महाआघाडीकडून तेजस्वी यादव यांनी एकट्याने झुंज दिली होती. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात राजदला 75 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला केवळ 19 जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान शिवसेनेचेही 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांना नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली.यानंतर आता राज्यातील भाजप नेते आशिष शेलारांनी शिवसेना आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

'भ्रष्टाचारी काँग्रेससोबत सलगी केलेलेल्या 'जगंलराज का युवराज'ला बिहारच्या जनतेने नाकरले आहे. महाराष्ट्रात पण भ्रष्टाचारी काँग्रेससोबत 'जंगलाचे बेगडी प्रेमी युवराज' युती करुन बसलेत. समजनेवाले को इशारा काफी है,' असे म्हणत शेलारांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला आहे.

तसेच पुढे ते म्हणाले की, 'काँग्रेसने महाराष्ट्रात 'हातात' 'धनुष्यबाण' धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला. आता महाराष्ट्रातदेखील जनतेच्या 'घड्याळाचे' काय सांगावे टायमिंग…? पंचायत ते पार्लमेंट मॅन ऑफ द मॅच पंतप्रधान नरेंद्र मोदीच! त्यांच्यासह नितीश कुमारजी, देवेंद्रजीं फडणवीस यांचे अभिनंदन,' असे म्हणत आशिष शेलार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधला.

नुकतेच बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. शिवसेनेकडून 22 उमेदवार उभे होते, या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान मिळाले. बिहारमध्ये शिवसेना उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले, 1 टक्केही मतदान शिवसेनेला झालेले नाही.

बातम्या आणखी आहेत...