आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आदित्य ठाकरेंवर निशाणा:एक वटवृक्ष वाचवून युवा नेत्यांनी केवढं कौतुक करुन घेतलं...आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंवर साधला निशाणा

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपाकडून सत्ताधाऱ्यांवर सातत्याने टीका केली जात असते. आज पुन्हा एकदा भाजपा नेते आशिष शेलारांकडून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मिरज ते पंढरपूर मार्गावरील भोसे (ता. मिरज) येथील 400 वर्षांचा वटवृक्ष वाचवण्यासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नियोजित राष्ट्रीय महामार्गात सुधारणा करावी, अशी विनंती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींना केली होती. त्यानंतर नितीन गडकरींनी प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाचा नकाशा बदलण्याचे आदेश दिले होते. यानंतर आदित्य ठाकरेंचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले होते. याच कारणावरुन शेलारांनी निशाणा साधला आहे.

'400 वर्षे जुना एक वटवृक्ष वाचवून युवा नेत्यांनी केवढं कौतुक करुन घेतलं! पण मुंबईत काय सुरु आहे... ? लॉकडाऊन मध्ये 1282 झाडांची कत्तल करण्याचे प्रस्ताव मंजूर झाले आता अजून 632 झाडे तोडणे किंवा प्रत्यारोपण करण्याचा प्रस्ताव तयार!! मुंबईत झाडांचा कत्तलखानाच सुरु आहे!' असं ट्विट करत आशिष शेलारांनी टीकास्त्र साधलं आहे.

रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या मिरज तालुक्यातील भोसे गावाजवळील 400 वर्ष जुन्या वटवृक्ष तोडले जाणार होते. यानंतर गडकरींनी नकाशा बदलण्याचे आदेश दिल्यानंतर या हायवेच्या सर्व्हिस रोडसाठी पर्याय काढून 400 वर्षे जुना वटवृक्ष वाचवण्याचा निर्णय महामार्ग प्राधिकरणाने घेतला होता. महामार्गाच्या रचनेत थोडा बदल करुन बायपास रस्त्याला पर्याय शोधण्याचा निर्णय नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) आणि दिलीप बिल्डकॉन या रस्ता बांधणी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला होता.