आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलिकांना टोला:मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी....! नवाब मलिकांच्या चौकशीवरुन आशिष शेलारांचे खोचक ट्विट

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे. सकाळी सात वाजल्यापासून नवाब मलिकांची चौकशी सुरू आहे. मंत्री नवाब मलिक यांची चौकशी होत असल्याने राजकीय वातावरण तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या घटनेचा निषेध केला जात आहे. दरम्यान आता याविषयावरुन भाजपचे नेते आशिष शेलारांनी नवाब मलिकांना खोचक टोला लगावला आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करून नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी....! असे म्हणत खोचक टोला लगावला आहेत. तसेच ज्याने खीर खाल्ली नाही, त्याने घाबरण्याचे कारण नाही. पण ज्याने ज्याने खीर खाल्ली त्याने त्याने किती ही चेहरा भोळा भाबडा केला, कांगावा केला, तरी घागर बुडणारच! असा मजकूर लिहिलत आशिष शेलार यांनी ट्विट केले आहे.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांना ईडीने चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी अचानकपणे नेले असल्याची माहिती आहे. सकाळी 7.45 वाजेपासून मलिकांची चौकशी सूरू आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अंडरवर्ल्डशी संबधित जमीन खरेदी व्यवहाराप्रकरणी मलिकांची विचारपूस करण्यात येत आहे. ईडीचे पथक मलिकांच्या निवासस्थानी पहाटे 5 ते 6 दरम्यान गेले होते. त्यानंतर 7 वाजेदरम्यान पथक मलिकांच्या घरातून बाहेर पडले आणि 7.45 वाजता ईडीचे पथक कार्यालयात हजर झाले.

बातम्या आणखी आहेत...