आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशमुखांच्या आरोपानंतर भाजपची टीका:गृहमंत्री अनिल देशमुख हे महाविकास आघाडी सरकारच्या सर्कशीतले जोकर; भाजपची खोचक टीका

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोप सिद्ध करा नाही तर जनतेची माफी मागून तोंड काळे करा. असे अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे.

एम्सच्या लीक झालेल्या अहवालानंतर अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांचा मृत्यू खून नव्हे तर आत्महत्या असल्याचे सिद्ध झाले. यावरुन महाविकास आघाडी सरकारकडून भाजपवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान भाजपने सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी राजकारण केले. बिहारच्या निवडणुका समोर ठेवून तेथील डीजीपी गुप्तेश्वर पांडेंनी महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना बदनाम करत आपली राजकीय पोळी भाजून घेतली. आता देवेंद्र फडणवीस त्यांच्या प्रचाराला जाणार का? असा सवाल गृहमंत्री अनिल देखमुखांनी केला. यानंतर आता भाजपकडून अनिल देशमुखांना खोचक टोला लगावला आहे.

यावरुन आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख हे राज्यात सुरू असलेल्या महाविकासआघाडी नावाच्या सर्कशीतले जोकर असल्याचं म्हणत खोचक टोला लगावला आहे. या आधी भाजपा सरकारवर केलेले फोन टॅपिंगचे आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत,आता सुशांतप्रकरणी त्यांनी बोगस अकाउंटचा आरोप केला आहे. आरोप सिद्ध करा नाही तर जनतेची माफी मागून तोंड काळे करा. असे अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे.

काय म्हणाले होते देशमुख

देवेंद्र फडणवीस यांना भाजपाने बिहार निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टीका केली. तसेच तुम्ही गुप्तेश्वर पांडेंचा प्रचार करणार का? असा सवाल उपस्थित केला आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजपा) राज्याची प्रतिमा डागाळल्याचा आरोप करत देशमुख म्हणाले, "सुशांत प्रकरणाची मुंबई पोलिसांनी योग्य चौकशी केलेली नाही, असे महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सुनावणी दरम्यान असे निदर्शनास आणून दिले होते की मुंबई पोलिसांनी याप्रकरणी योग्यप्रकारे चौकशी केली आहे. तरीही मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे काम केले गेले.

बातम्या आणखी आहेत...