आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपचे टीकास्त्र:'पाठीमागून सूत्र हलवण्यापेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी' - भाजप

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अतुल भातळखकर यांनी सोशल मीडियावरुन शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या आरोपामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. आरोपांनंतर धनंजय मुंडे यांनी शरद पवारांची भेट घेऊन प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. पवारांनीही तक्रार गंभीर असून पक्षातील नेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे म्हटले. यादरम्यान शरद पवारांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे वृत्त होते. यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

अतुल भातळखकर यांनी सोशल मीडियावरुन शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 'पोलीस अधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री? राज्यात कोणतेही अधिकार पद नसलेल्या पवारांशी चर्चा करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी मी कॅबिनेट सचिवांकडे करणार आहे' अस अतुल भातखळकर यांनी म्हणाले आहेत.

तसेच पुढे भातखळकर मुख्यमंत्र्यांना टोला लगावत म्हणाले की, 'पाठीमागून सूत्र हलवण्यापेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी'

धनंजय मुंडेंवरील आरोपांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच मुंबई पोलीस दलातील आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये धनंजय मुंडे प्रकरणावर चर्चा झाल्याचे वृत्त होते. आयपीएस अधिकाऱ्याच्या या भेटीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टीका करत मुख्यमंत्र्यांनाही टोला लगावला आहे.