आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप आक्रमक:भाजप राणे यांच्या पाठीशी, अटकेच्या निषेधार्थ प्रखर निदर्शने करणार; भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची घोषणा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नारायण राणेंच्या विरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

भारतीय जनता पार्टी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पाठीशी असून त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपाचे कार्यकर्ते राज्यभर प्रखर निदर्शने करतील, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी मंगळवारी केली आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना पाटलांनी ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर नारायण राणेंना अटक करण्यात आली आहे.

नारायण राणेंच्या विरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. 'कोणतेही अटक वॉरंट नसताना केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याचा प्रकार देशात पहिल्यांदाच घडला आहे. जनादेशाच्या विरोधात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने सत्तेचा दुरूपयोग करून सूडबुद्धीने राणे यांना अटक केली आहे. भाजप याचा निषेध करते.' असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी निषेध व्यक्त केला आहे.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'नारायण राणे हे पक्षासाठी महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या कर्तृत्वामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला आहे. राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेला मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे घाबरून आघाडी सरकारने कारवाई केली आहे. त्यासाठी बळाचा वापर करा, असे पालकमंत्री सांगत असल्याचेही वाहिन्यांवरून स्पष्ट झाले आहे. नारायण राणे यांच्या सुटकेसाठी भाजपा सर्व ते प्रयत्न करेल. या बाबतीत न्यायालय योग्य तो आदेश देईल, असा विश्वास आहे. खासदार म्हणून त्यांना असलेल्या विशेषाधिकारांचा भंग झाल्यामुळे संसदेत संबंधितांकडेही भाजपाच्या खासदारांकडून तक्रार करण्यात येईल.'

काय आहे प्रकरण?
भाजप नेत्यांची सध्या जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. या निमित्त नारायण राणे हे सध्या कोकणामध्ये आहेत. दरम्यान त्यांनी पत्रकारांसोबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना संबोधित असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचे न बोलता चुकून हिरक महोत्सव हा शब्द वापरला. दरम्यान तिथे उपस्थित राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेंनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचे सांगितले यानंतर मुख्यमंत्र्यांनी चूक सुधारत 'आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हिरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत' असे म्हटले होते. यावरुन राणे म्हणाले होते की, मी जर तिथे असतो तर कानाखाली लगावली असती. यावरुन नारायण राणेंवर टीका होत आहे आणि त्यांना अटकही झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...