आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Mumbai
 • BJP Became Aggressive On The Issue Of OBC Reservation: Demonstrations Started At 1000 Places In Maharashtra, Activists Detained At Many Places

ओबीसी आरक्षणावर भाजप आक्रमक:राज्यात एक हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन, अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

मुंबईएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
संबळ वाजवताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर
 • सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण रद्द करण्याच्या मुद्द्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या घोषणेनंतर आज भाजप कार्यकर्ते राज्यभरात एक हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन आहेत. ठाणे, मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, सोलापूरसह राज्यात बऱ्याच ठिकाणी चक्काजाम करण्यात आला. भाजपच्या या प्रस्तावित निषेधाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठाण्यात गोंधळ निर्माण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे.

भाजपच्या या आंदोलनाविरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी घोषणा केली आहे की, ते केंद्रांच्या विरोधात लवरच राज्यव्यापी आंदोलन करतील.

आंदोलनाचे अपडेट्स

 • ठाकरे सरकारविरोधात वसईत भाजपचे चक्का जाम सुरू झाले आहे. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजप नेते प्रसाद लाड, वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते चाक जाम आंदोलन आहेत.
 • खासदार रामदास तडस, जिल्हाध्यक्ष शिरीष गोडे यांच्या नेृत्त्वात शेकडो भाजप कार्यकर्तेय शहराच्या बजाज चौकात चक्का जाम करत आहेत.
 • नाशिकमध्ये भाजप कार्यकर्ते मुंबई-आग्रा महामार्गावर बसून आंदोलन करत आहेत. इथल्या पोलिसांशी त्यांचे भांडणही झाले.
 • कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबईच्या मुलुंडचे चेकनाकाचे छावणीत रूपांतर झाले असून शेकडो पोलिस कर्मचारी तिथे तैनात आहेत.
 • विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शेकडो भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर निषेध करत आहेत. येथे नेत्यांनी जेल भरो आंदोलन जाहीर केले आहे.
 • मुंबईत भाजप आशिष शेलार आणि खासदार मनोज कोटक यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी मुलुंड टोल ब्लॉकवर चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे.
 • पुण्यात पंकजा मुंडे आणि परळीत प्रीतम मुंडेंच्या नेतृत्त्वात आंदोलन केले जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही
महाराष्ट्र सरकारच्या जिल्हा परिषद अधिनियमातील कलम 12 सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले होते. लोकसंख्येनुसार आरक्षणाची व्यवस्था निश्चित करण्यात आली असून कोणत्याही परिस्थितीत 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण देता येणार नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले होते. ओबीसींना 27% पेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही, असेही सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे आदेश दिले होते. या घटनात्मक मर्यादेचे पालन करत जिल्हा परिषदेत निवडणुका घेण्यात याव्यात. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द करण्याच्या निर्णया नंतर महाराष्ट्रात न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल केली होती, परंतु कोर्टानेही ती रद्द केली आहे.

भाजपची घोषणा: निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या नाहीत तर ओबीसी उमेदवार प्रत्येक जागेवर उभे करु
या विषयावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले - प्रस्तावित पाच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पुढे न घेतल्यास भाजप प्रत्येक जागेवर केवळ ओबीसी चेहरा उभा करेल. फडणवीस म्हणाले होते की, "राज्य सरकारने मागासवर्ग आयोग गठित करावा आणि ओबीसी आरक्षणासाठी डेटा सादर करावा. जर सरकारला आमच्या मदतीची गरज असेल तर आम्ही त्यांना सहकार्य करण्यास तयार आहोत. पण कदाचित या सरकारचा ओबीसींना आरक्षण देण्याचा हेतू नव्हता.

बातम्या आणखी आहेत...