आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंडखोरांना किंंमत मोजावी लागेल:शरद पवारांचा इशारा; एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपच, बंडखोर शिवसेनेत परततील

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील सत्ता संघर्षावर थेट वक्तव्य करीत एकनाथ शिंदे यांच्या बंडाला भाजपचाच पाठींबा असल्याचे अप्रत्यक्ष सांगत बंडखोरांना त्यांच्या कृत्याची किंमत मोजावी लागेल असा इशाराच दिला.

शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली परखड मत स्पष्ट केले. त्यांनी एकनाथ शिंदे गटाला इशारा देतानाच बंडखोर राज्यात परतल्यानंतर शिवसेनेचे असतील असा विश्वासही व्यक्त केला.

एकनाथ शिंदेंना भाजपचाच पाठींबा

एकनाथ शिंदेंना कुणाचा पाठिंबा आहे हे शरद पवारांनी त्यांच्या खास शैलीत उघड केले. माझ्याकडे राष्ट्रीय पक्षांची यादी आहे. त्यात सीपीएम, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अन्य दोन पक्ष एकनाथ शिंदेंना साथ देऊ शकत नाही, आता उरलेला पक्ष तुम्हीच ओळखा असे सांगत त्यांनी भाजपची शिंदेंना फुस असल्याचे स्पष्ट केले.

मविआचा प्रयोग फसला नाही

पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग फसला नाही, असे शरद पवार म्हणाले. अडीच वर्ष महाविकास आघाडीने उत्तम कारभार केला, अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कोरोना संकटाच्या काळात आरोग्य खात्याने चांगले काम केले असे असताना महाविकास आघाडीचा प्रयोग फसला असे सांगणे राजकीय अज्ञान असल्याचे ते म्हणाले.

बंडखोर पुन्हा शिवसेनेत जातील

पवार म्हणाले, राज्याच्या बाहेर गेलेले नेते परत येतील त्यावेळी ते शिवसेनेला मतदान करतील, असे शरद पवार म्हणाले. सरकार अल्पमतात आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार विधानसभेला आहे. विधानसभेत हे सरकार बहुमतात आहे, हे स्पष्ट होईल, असे शरद पवार म्हणाले.

ठाकरे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल

पवार म्हणाले की, सरकार बहुमतात आहे हे येत्या काळातच सिद्ध होईल. ठाकरे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, असे शरद पवार म्हणाले. तिथे गेलेल्या बंडखोरांना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससोबत राहण्याची इच्छा नाही, त्यामुळे संजय राऊतांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे वक्तव्य केले असावे.

अन् पवारांनी वाचली कुंडलीच

पवारांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ टेलिव्हिजनवर पाहिला आहे. त्यामध्ये ते राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे असे म्हणतात. माझ्या हातात राष्ट्रीय पक्षांची यादी आहे त्यात सीपीएम, सीपीआय, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचा पाठिबा त्यांना नाही. पाचव्या पक्षाचाही पाठींबा नाही आता उरलेला एक पक्ष कोणता हे सांगायची गरज नाही. सूरत आणि आसामला जी व्यवस्था करणारी लोक दिसली ती अजित पवारांच्या परिचयाचे आहेत असे मला वाटत नाहीत. पण ते माझ्या परिचयाचे आहेत.

आताच कसे हिंदुत्व आठवले?

आज जे हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत आहेत, त्यांना अडीच वर्षांपूर्वी आमच्यासोबत सत्तेची फळे चाखताना समजले नव्हते का त्यांना आताच कसे हिंदुत्व आठवले त्यांच्या या मुद्याला काहीही अर्थ नाही असे पवार यांनी सांगितले.