आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेत सुरू असलेल्या महाभारतामागे भाजप असून, त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही; त्यामुळे ते गप्प आहेत. मात्र, आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहोत. गरज पडल्यास त्यांना बाहेरून पाठिंबाही देण्याची आमची तयारी आहे. महाविकास आघाडीत आम्ही आहोत आणि राहणारच अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसची भूमिका जाहीर केली.
म्हणून राऊतांचे तसे वक्तव्य
नाना पटोले म्हणाले, राजकीय महाभारत शमायला हवे, अस्थिर व्यवस्थेत जनतेचे नूकसान होत आहे हे थांबावे ही काँग्रेसची भूमिका आहे. संजय राऊतांच्या वक्तव्यावरही चर्चा झाली. शिवसेनेत फुट पाडण्यासाठी भाजपचे कारस्थान सुरु आहे, हे वादळ शमवण्यासाठी संजय राऊत यांनी तसे वक्तव्य त्यांनी केले ते त्यांचे अंतर्गत वक्तव्य आहे असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
आम्ही सरकारसोबतच
पटोले म्हणाले, काँग्रेस महाविकास आघाडीत राहणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे. भाजपने राज्यात सत्तासंघर्ष सुरु केला पण ते आजही समोर येत नाही. अजूनही आम्ही उद्धव ठाकरे सरकारच्या मागे आहे असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
महाभारतामागे भाजप
पटोले म्हणाले, इडीचा धाक दाखवण्याचे काम भाजप करीत आहे. महाभारतामागे भाजप आहे, अजूनही भाजप शांत आहे त्यांच्याकडे संख्याबळ नसल्यानेच ते गप्प आहेत. राज्यात अस्थिरता असेल तर जनतेचे नूकसान होत आहे हे होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे.
काय म्हणाले अशोक चव्हाण?
भाजपला रोखण्यासाठीच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष एकत्र आले. त्यानंतर किमान समान कार्यक्रमानुसार या तीन पक्षांनी सत्ता स्थापन केली. त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये असून पुढेही राहील अशी स्पष्टोक्ती काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आज दिली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
सह्याद्रीवर काँग्रेसची बैठक सुरु आहे, बैठक सुरु असतानाच अशोक चव्हाण बाहेर आले तेव्हा त्यांना माध्यमांनी प्रश्न विचारले. त्यावेळी त्यांनी आपण महाविकास आघाडी सरकारमध्येच सहभागी आहोत आणि राहणारच अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली.
भाजपला रोखणे हा उद्देश
अशोक चव्हाण म्हणाले की, सरकार स्थापन करण्यामागे भाजपला रोखणे हा उद्देश होता. त्या उद्देशाने आणि किमान समान कार्यक्रमाद्वारे महाविकास आघाडी स्थापन झाली होती. महाविकास आघाडीत काॅंग्रेस आधीही होती आणि आताही आहे आमचे महाविकास आघाडीला समर्थन आजही आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.