आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे समर्थन:राणेंचे वाक्य चुकले नाही, थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद; चंद्रकांत पाटलांकडून केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे समर्थन

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेना-भाजप राज्यात आमने-सामने आल्याचेच चित्र दिसत आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. यानंतर राज्यातील राजकारण पेटले आहे. मंगळवारी अवघ्या महाराष्ट्रात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत राणेंविरोधात आंदोलने केली. असे असताना नारायण राणेंना अटक करण्यात आली. रात्री उशीरा त्यांना जामीनही देण्यात आला असला तरीही अजुनही शिवसेना-भाजप राज्यात आमने-सामने आल्याचेच चित्र दिसत आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे समर्थन केले आहे.

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'राणेंचे वाक्य चुकलेले नाही, थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद आहे. असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, 'उद्धव ठाकरे देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहेत हा संदर्भ देताना चुकले. यावर राणे साहेब मी शेजारी असतो तर थोबाडीत मारली असती असे म्हणाले होते. मात्र हा कॉमन संवाद आहे. ते थोबाडीत मारायला मातोश्रीवर जाणार आहेत, शोधून थोबाडीत मारणार आहे असे ते म्हणाले होते का?' असा उलट सवालच चंद्रकांत पाटलांनी केला.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'मंगळवारी दिवसभरात झालेला राजकीय खेळ हा सूडबुद्धीने झाला असल्याचे सिद्ध झाले आहे. आता राणेंना जामीन देण्यात आला. एसपीकडे दोनदा हजेरी लावण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना नोटीस देण्यात आली आणि यापुढे बोलत असताना सांभाळून बोलण्यास सांगितले आहे. सत्याचा विजय झालाय.' असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...