आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाक् युद्ध:राऊतांची मानहानी सव्वा रुपयांची नक्कीच नाही, त्यांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी; चंद्रकांत पाटील यांचा खोचक टोला

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजकारणात आम्ही एकमेकांना चिमटे काढत असतो. मात्र या चिमट्याची जखम होता कामा नये

चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर पीएमसी बँक घोटाळ्याविषयी भाष्य केले होते. यावरुन संजय राऊतांनी पाटलांवर सव्वा रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे सांगतिले होते. आता चंद्रकांत पाटलांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. राऊतांची मानहानी सव्वा रुपयांची नाही, त्यांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी, असा खोचक टोला चंद्रकांत पाटलांनी माध्यमांशी बोलताना लगावला आहे..

चंद्रकांत पाटील याविषयावर बोलताना म्हणाले की, 'शिवसेना नेते संजय राऊत यांनी माझ्यावर सव्वा रुपयांची मानाहानी करणार असल्याचे मी ऐकलेय. कोणी 100 कोटी आणि 50 कोटीचे दावे करत आहेत. आता हे सव्वा रुपयाचा दावा करत असल्याचे दिसतेय. पण संजय राऊत माझे मित्रं आहेत. त्यामुळे मी त्यांना सूचवेल की किंमत थोडी वाढवावी लागेल. कारण शेवटी मानहानीचा दावा म्हणजे काय? माझी मानहानी झाली ती मानहानी एवढ्या कोटीची आहे, असा मानहानीचा अर्थ होतो. राऊतांची मानहानी सव्वा रुपयांची नाही. त्यांनी ती मानहानी वाढवावी' असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला आहे. तसेच पुढे ते म्हणाले की, 'राजकारणात आम्ही एकमेकांना चिमटे काढत असतो. मात्र या चिमट्याची जखम होता कामा नये. त्यामुळे संजय राऊतांची मानहानी सव्वा रुपयाची नक्कीच नाही.'

काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, 'पीएमसी बँक घोटाळ्याविषयी पाटील यांनी पत्रात जे आरोप केलेले आहेत ते मला मान्य नाही. असले फालतू धंदे आम्ही करत नाहीत. असे घोटाळे केले असते तर एवढी वर्ष राजकात टीकलो नसतो. तसेच पाटील यांनी जे आरोप केले आहेत, त्यावरुन त्यांना येत्या चार दिवसांमध्ये कायदेशीर नोटीस पाठवली जाईल. मी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे. मात्र मी इतरांप्रमाणे कोट्यवधी रुपयांचा दावा ठोकणार नाही. मी पाटलांवर केवळ सव्वा रुपयांचा दावा ठोकणार आहे. कारण पाटलांची लायकी कोट्यवधी रुपयांची नाही. त्यांची किंमतच केवळ सव्वा रुपया आहे' अशी टीका राऊतांनी केली होती.

पीएमसीविषयी काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
सामना अग्रलेखात संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना ईडीचा अनुभव कुठून आला असा अग्रलेख लिहिला होता. यावरुन पाटील म्हणाले होते की, 'संजयराव तुमचा प्रश्न रास्त आहे. मला ईडीचा अनुभव नाही. तो येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो. आर्थिक गैरव्यवहार केले की, ईडीचा अनुभव येतो. तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता. अखेर बरीच धावपळ करून, ते पैसे परत देऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न तुम्ही धापा टाकत केलात. हे सर्व पाहिल्यावरून मी अंदाज बांधला की पन्नास लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर 127 कोटींसाठी नक्कीच फेस येणार. असे त्रैराशिक मांडून मी अंदाज बांधला, पण मला ईडीचा अनुभव नाही हे मात्र खरेच आहे.'

बातम्या आणखी आहेत...