आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान परिषद:भाजपने ऐनवेळी बदलला उमेदवार, पंकजासमर्थक रमेश कराड यांना संधी

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: चंद्रकांत शिंदे
  • कॉपी लिंक
  • पक्षाने डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले

भाजपने मंगळवारी अचानक विधान परिषदेसाठी नांदेडचे डॉ. अजित गोपछडे यांची उमेदवारी रद्द करून पंकजा मुंडे समर्थक रमेश कराड यांना उमेदवार जाहीर केले. भाजपच्या केंद्रीय समितीने या चार जागांसाठी नावे निश्चित केली. ८ मे रोजी सर्वांनी उमेदवारी अर्ज भरले. सोमवारी पंकजा मुंडेसमर्थक लातूर ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांनी आपला अर्ज भरला तेव्हा तो डमी असल्याचे सांगितले गेले. परंतु मंगळवारी डॉ. गोपछडे यांनी काही कारणामुळे असमर्थता दर्शवल्याने कराड यांचे नाव जाहीर करण्यात आले, असे भाजप सूत्रांनी सांगितले.

२०१८ मध्ये बीड-उस्मानाबाद-लातूर मतदारसंघातून रमेश कराड यांना राष्ट्रवादीने तिकीट दिले. परंतु ऐन निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत भाजपचे सुरेश धस यांना पाठिंबा दिला. यामुळे राष्ट्रवादीला अपक्ष उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागला होता. विधानसभा निवडणुकीत कराड यांना लातूर ग्रामीणमधून अपेक्षा होती. परंतु हा मतदारसंघ शिवसेनेला सुटला होता.

रमेश कराड यांना आश्वासन दिले होते म्हणून...

कराड हे पंकजा मुंडे यांचे समर्थक असले तरी ते भाजपचे जिल्हाध्यक्ष असून त्यांना आश्वासन देण्यात आले होते. केंद्रीय समितीकडे त्यांचेही नाव पाठवले होते. केंद्रीय नेतृत्वाकडून चार नावे अंतिम झाल्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. डॉ. गोपछडे यांनी अर्ज भरला. परंतु नंतर त्यांनी वैयक्तिक कारणामुळे असमर्थता दर्शवली. याबाबत केंद्रीय नेतृत्वाशी चर्चेनंतर कराड यांना अर्ज भरावयास लावला. मंगळवारी त्यांची उमेदवारी जाहीर केली, असे भाजप सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...