आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची टीका:राज्य महिला आयोग अध्यक्षपदावर रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका, रुपाली चाकणकरांच्या नावाच्या चर्चेवर चित्रा वाघ यांचे ट्विट

मुंबई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं

राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (जि. पुणे) यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित झाली आहे. याबाबत गुरुवारी घोषणा होण्याची शक्यता आहे. यावरुन आता यावरुन भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत चाकणकरांवर निशाणा साधला आहे. यावरुन आता नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

'महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका. अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल' असे म्हणत चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या होणाऱ्या अध्यक्षावर निशाणा साधला आहे. या यादीमध्ये रुपाली चाकणकरांचे नाव जवळपास निश्चित असल्याने वाघ यांनी चाकरणकर यांचा उल्लेख 'शुर्पणखा’केल्या असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महामंडळांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. शिवसेना-भाजप युती सरकार काळात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती रद्द करण्यात आल्यानंतर आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे. त्यामुळे आता रुपाली चाकणकर यांची महिला अध्यक्षपदी वर्णी लागणार आहे. त्याच प्रमाणे अन्य महामंडळावरील नियुक्त्याही सरकारकडून लवकरच केल्या जाणार असल्याचे समजते.

बातम्या आणखी आहेत...