आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजराती व्होट बँकेवर भाजपची नजर:नवरात्रीच्या काळात दाखल केलेले गुन्हे मागे घ्या, मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरात्री दरम्यान मध्यरात्री बारा वाजेपर्यंत गरबा-दांडिया आयोजित करण्यास परवानगी देण्याच्या मागणीवर निर्णय होण्यापूर्वीच शिंदे गट आणि भाजपमध्ये श्रेयाची शर्यत सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मागणीनंतर आता भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी नवरात्रीच्या काळात कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे.

भाजप खासदार शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. दहीहंडी आणि गणेशोत्सवादरम्यान ज्यांनी कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा मागे घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. यासोबतच गतवर्षी नवरात्रीच्या काळात दाखल झालेले असे गुन्हे मागे घेण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावेत, अशी मागणी आता मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

लाऊडस्पीकरला परवानगी द्या

नवरात्रीत यंदाच्या चार दिवस मध्यरात्रीपर्यंत लाऊडस्पीकर वाजवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपचे खासदार शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री 10 नंतर लाऊडस्पीकर वाजवता येणार नाहीत. मात्र नवरात्रीच्या काळात लोकांना पूजा करून गरबा-दांडिया खेळता यावा यासाठी सरकारने मध्यरात्रीपर्यंत लाऊडस्पीकर वाजवण्याची परवानगी द्यावी.

सुर्वेंनीही केली मागणी

शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुख्यमंत्र्यांकडे नवरात्रीचे नऊ दिवस मध्यरात्री 12 वाजता गरबा-दांडिया आयोजित करण्याची परवानगी मागितली आहे. तर भाजप खासदार शेट्टी यांनी सरकारने केवळ चार दिवस मध्यरात्रीपर्यंत लाऊडस्पीकर वाजवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

लवकरच मनपा निवडणूका

लवकरच मुंबई, ठाणे, वसई-विरार, मीरा-भाईंदर, नवी मुंबईसह अनेक महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या नगरपालिकांमध्ये गुजराती मतदारांची संख्या मोठी आहे. ही व्होट बँक खूश करण्यासाठी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत गरबा-दांडिया आयोजित करण्याची परवानगी मागितली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...