आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची मुख्यमंत्र्यांवर टीका:मुख्यमंत्री वैफल्यग्रस्त असल्याने त्यांच्याकडून असे वक्तव्य; प्रवीण दरेकर यांची शिवसेनेवर टीका

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री वैफल्यग्रस्त असल्याने त्यांच्याकडून कानाखाली मारण्याची भाषा करण्यात येत आहे. त्यांना एक प्रश्न विचारला की दुसरे उत्तर देतात असा टोला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

शिवसेनेचे सत्तेसाठी सर्व काही सुरू

विमानतळाचे नामांतर संदर्भात बद्दल विचारले तर दुसरा प्रश्न विचारतात, मात्र केवळ केंद्राकडे बोट दाखवण्याचे काम मुख्यमंत्री ठाकरेंचे सुरू आहे. औरंगाबादचे संभाजीनगर करतो असे टीझरमध्ये सांगितले मात्र राज्यसभेच्या निवडणुकीसाठी एमआयएम, सपा यांना काही कबूल केले आहे. त्यामुळे औरंगाबादचे नामांतर आणि हिंदूत्व हे कालबाह्य मुद्दे शिवसेनेसाठी ठरले आहे. असा टोला त्यांनी लगावला आहे. तर कमान समान कार्यक्रम आणि सत्ता टिकवणे यासाठीच शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

हनुमान चालिसेच्या मुद्द्यावरून टोला

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत, कलम 370 रद्द होईल, काश्मीर आमच्या देशाचा अविभाज्य भाग आहे. इथे एकच झेंडा चालेल हे केवळ भाजप करू शकले आहे. हे 56 इंचाच्या छातीच्या पंतप्रधानानी करून दाखवले असे म्हणत मर्द ना मर्द हे देशातील जनता बघत आहे. असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

नांदा सौख्यभरे - दरेकर

​​​​​​राज्यात काय सुरू आहे आपन सगळे बघतो आहोत. शिवसेनेची प्रगती होत आहे की अधोगती हे सर्वांना दिसत आहे.​ 30 वर्षे भाजपसोबत सडले म्हणतात, युतीचे नेतृत्व तर बाळासाहेबच करत होते हे त्यांना माहिती नाही असेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. संघाचे देशासाठी काय योगदान हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, स्वत: हिरव्या सापासोबतबसून आम्हाला हिंदूत्व शिकवू नये असा टोला दरेकरांनी शिवसेनेला लगावला आहे. केंद्राकडून आलेला निधी जे सरकार खरचू शकले नाही, त्यांनी केंद्र सरकारवर टीका करू नये असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

बातम्या आणखी आहेत...