आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारवर टीकास्त्र:‘माझे वीजबिल, मलाच झटका…; वीजपुरवठा खंडीत करण्याच्या निर्णयावरुन भाजपची सरकारवर टीका

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंत्र्यांना गाड्या, कंत्राटदारांना मलई आणि बिल्डरांना सवलती पण गोरगरीबांच्या नशिबी आश्वासनांचा धत्तुरा

वीज बिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहे. यावर भाजपने राज्य सरकारव टीका केली आहे. 'माझे घर माझी सुरक्षा, माझे वीजबिल मलाच झटका,' असे म्हणत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्येंनी सरकारवर निशाणा साधला.

केशव उपाध्येंनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, सर्वसामान्यांचे वीज कनेक्शन त्वरीत खंडित करण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय म्हणजे नवी गाथा आहे. माझे घर माझी सुरक्षा, माझे वीजबिल मलाच झटका, मंत्र्यांना गाड्या, कंत्राटदारांना मलई आणि बिल्डरांना सवलती, गोरगरीब मागती दिलासा तर त्यांच्या नशिबी मात्र आश्वासनाचा धत्तुरा, असे म्हणत उपाध्येंनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

सरकारने सामान्यांच्या तोंडी पाने पुसली

दरम्यान, मुळात अव्वाच्या सव्वा वीज बिल आली त्यात सवलती देण्याच्या घोषणा झाल्या पण बिल्डर, कंत्राटदारांसाठी तातडीने काम करणाऱ्या राज्य सरकारने सामान्यांच्या तोंडी पाने पुसली, असेही उपाध्ये म्हणाले.

कोरोना काळात वीजपुरवठा खंडीत न करण्याचा घेतला होता निर्णय

मार्च 2020 मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणने निर्णय घेतला होता. थकबाकीदार ग्राहकांना वीज बिल सुलभ हप्त्यामध्ये भरण्याची सवलत महावितरणने दिलेली आहे. सोबतच थकबाकीवर विलंब आकार न लावण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...