आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊतांनी 600 मराठी कुटुंब बेघर केली:उद्धव ठाकरेंना अभिमान वाटत असेल; भाजपची खोचक टीका

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

''संजय राऊतांचा उद्धव ठाकरेंना अभिमान वाटतो, हे साहजिक आहे. कारण, राऊतांनी 600 मराठी कुटुंबियांना बेघर केले. हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल. त्यांना वसुलीबहाद्दूराचाही अभिमान वाटतो अशा प्रखर शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपने ट्विटद्वारे टीका केली.

ईडीने रविवारी पहाटेच संजय राऊत यांची घरी जाऊन दिवसभर चौकशी केली. त्यानंतर रात्री उशीरा त्यांना अटक केली. यानंतर शिवसेना आक्रमक झाली. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठकही घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर भाजपने ही टीका केली आहे.

भाजपने का केली टीका?

संजय राऊत यांच्यावर पत्राचार घोटाळा प्रकरणात आरोप आहेत. त्याच आरोपाखाली त्यांना अटकही करण्यात आली. या प्रकरणानंतर उद्धव ठाकरेंनी राऊत यांच्या मातोश्रीची भेट घेत अखेरपर्यंत साथ देऊ असा विश्वास दिला तसेच ठाकरेंनी संजय राऊत यांचा अभिमान वाटतो असे म्हटले होते त्यामुळे भाजपने ठाकरे यांच्या भाष्यावर हल्ला चढवत टीका केली.

काय आहे ट्विट?

''संजय राऊतांचा उद्धव ठाकरेंना अभिमान वाटतो, हे साहजिक आहे. कारण, राऊतांनी 600 मराठी कुटुंबियांना बेघर केले. हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल. सचिन वाझे बद्दल पण आपल्याला असाच अभिमान वाटला होता. वसुली बहाद्दरांचा उद्धव ठाकरेंना नेहमीच अभिमान वाटतो.

काय म्हणाले होते ठाकरे?

राऊतांना ईडीचे अधिकारी घेऊन गेले, त्यावेळी त्यांच्या मातोश्री हवालदिल झाल्याचे झाल्या, त्यांना आपण वाऱ्यावर सोडले नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दाखविले आहे. संजय राऊत हे एकटे नाहीत. शिवसेना परिवार राऊतांसोबत आहे, असा विश्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांना दिला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. संजय राऊतांबद्दल नक्कीच अभिमान आहे, तो माझा जूना मित्र आहे. संजयचा गुन्हा काय, तो पत्रकार निर्भीड आहे. तो परखड बोलतो, मरण आले तरी शिवसेना सोडणार नाही असे वक्तव्य संजय यांनी केले याचा मला सार्थ अभिमान आहे.

बातम्या आणखी आहेत...