आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:महाविकास आघाडी सरकार कायद्याने चालत नाही हे राष्ट्रपतींना कळवा!; भाजप शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जि.प., पं.स. पोटनिवडणुकीत केवळ ओबीसी उमेदवार देणार

महाराष्ट्र सरकार हे कायद्याने चालत नाही, इथे संविधानिक नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे हे राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून द्यावे, अशी विनंती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली आहे. भाजप नेत्यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन तीन मागण्या केल्या. यामध्ये राज्य सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे, त्यामुळे दोन दिवसांऐवजी पूर्ण अधिवेशन घ्यावे, विधानसभा अध्यक्षांची रखडलेली निवडणूक घ्यावी, ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देऊ नका, अशा मागण्या भाजपने राज्यपालांकडे केल्या आहेत.

अधिवेशन दोन दिवसांचे आणि जिल्हा परिषद निवडणुका मात्र होतात, त्याला कोणता डेल्टा नाही ना कोणता व्हायरस. सरकारचे घोटाळे बाहेर येत आहेत, महाराष्ट्रात विद्यार्थी, महिला, आरक्षण याचा आक्रोश आहे. विधानसभा अध्यक्षपद रिक्त झाल्यानंतर ते तसेच ठेवता येत नाही असे संविधान सांगते. मात्र तरीही अध्यक्षपदाची निवडणूक आघाडी सरकार घेत नाही. अध्यक्षपद रिक्त ठेवणे हे राज्यघटनेचे अवमूल्यन करण्यासारखे आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.

जि.प., पं.स. पोटनिवडणुकीत केवळ ओबीसी उमेदवार देणार
राज्यातील पाच जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमधील ओबीसींच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती भाजपने राज्यपालांना केली असून निवडणुका झाल्या तर भाजप या जागांवर केवळ ओबीसी उमेदवार देईल. ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजप पाठपुरावा करेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी या वेळी दिली.

बातम्या आणखी आहेत...