आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपचा आघाडी सरकारला सवाल:सत्ता पक्षातील लोकांना लैंगिक स्वैराचार करण्याची मुभा नवीन कायद्याने आपण दिली आहे का? - देवेंद्र फडणवीस

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारला विचारायचे आहे की, सत्ता पक्षाला वेगळा आणि सामान्यांकरता वेगळा न्याय आहे का?
  • पोलिसांची एवढी लाचार अवस्था मी यापूर्वी कधीच पाहिलेली नाही

राज्यभरात संजय राठोड प्रकरणावरुन राजकारण तापले असल्याचे दिसत आहे. दरम्यान भाजप या विषयावर सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहे. आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर टीकास्त्र साधले आहे. सत्ता पक्षातील लोकांना लैगिंक स्वैराचार करण्याची मुभा नवीन कायद्याने आपण दिली आहे का? असा सवाल फडणवीसांनी आघाडी सरकारला विचारला आहे.

सरकारला विचारायचे आहे की, सत्ता पक्षाला वेगळा आणि सामान्यांकरता वेगळा न्याय आहे का? सत्ता पक्षातील लोकांना लैंगिक स्वैराचार करण्याची मुभा नवीन कायद्याने आपण दिली आहे का? ही कोणती शक्ती तुम्ही तुमच्या नेत्यांना दिली आहे? असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे. तसेच हा शक्ती कायदा सगळा फास आहे. कायदे करुन काहीच हाशील होणार नाही. कारण हे कायदे सत्ता पक्षाला लागू नाहीतेय. म्हणून शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीमधून भारतीय जनता पक्षाचे सगळे सदस्य आज राजीनामा देणार आहेत. जर या ठिकाणी मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाणार नसतील. पुरावे उपलब्ध असतानाही मंत्री कायम राहणार असतील तर कायद्याची आवश्यकता काय? मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही तर भारतीय जनता पक्षाचे सदस्य राजीनामा देतील. असा इशारा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

पोलिसांची एवढी लाचार अवस्था मी यापूर्वी कधीच पाहिलेली नाही
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, 'संजय राठोड यांच्या ऑडियो उपलब्ध आहेत, सर्व पुरावे आहेत. तरीही पोलिसांची एवढी लाचार अवस्था मी यापूर्वी कधीच पाहिलेली नाही. जे पुण्याचे पीआय आहेत, ज्यांच्याकडे ही चौकशी आहे, त्यांना तात्काळ निलंबित करायला हवे. त्यांना नोकरीवर राहण्याचा अधिराकारच नाही. अशा वेळी ते सरकारची लाचारी स्वीकारत असतील, ढळढळीत पुरावे असतानाते कुठलीही कारवाई करत नाही तर हे चुकीचे आहे. असेही फडणवीस म्हणाले आहेत.'

राज्यामध्ये या सरकारचा चेहरा उघड
'एवढे पुरावे एखाद्या घटनेमध्ये असताना पोलिस कारवाई करत नाही, मंत्री राजीनामा देत नाही. संजय राठोड पूर्ण जबाबदार नाही, तर त्यांच्या वरीष्टांचा आशीर्वाद त्यांना आहे. यामुळे राज्यामध्ये या सरकारचा चेहरा उघड झाला आहे. मग ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण नेते असतील, ज्यांच्यावर आरोप लावल्यानंतर, एफआयआर दाखल झाल्यानंतरही कारवाई झाली नाही. महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार केल्यानंतर कोणतीही कारवाई झालेली नाही. महिलेने तक्रार मागे घेतली असेल तरी प्रश्न पूर्णपणे संपलेला नाही.' असे म्हणत फडणवीसांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावरही भाष्य केले आहे.

बातम्या आणखी आहेत...