आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेगासस स्पायवेअर:'भारत जेव्हा जेव्हा पुढे जातोय असे दिसते तेव्हा त्याला बदमान केले जाते', फडणवीसांनी फेटाळले हेरगिरीचे आरोप

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'पेगॅसिस स्पायवेअर'चा वापर करून जगातील अनेक देशांतील सरकार हे महत्त्वाच्या व्यक्तींची हेरगिरी करत असल्याचा दावा

इस्रायली बनावटीच्या 'पेगासस स्पायवेअर'च्या माध्यमातून भारतातील काही महत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात चर्चा सुरू असलेल्या पेगासस प्रकरणावरून मोठा राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातही अशा प्रकारे हेरगिरी झाल्याचा आरोप राज्यातील नेत्यांकडून करण्यात आला आहे. फडणवीस यांनी आज स्पष्ट शब्दांमध्ये हे आरोप फेटाळून लावले आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दुपारी पत्रकार परिषदेत यावर भाष्य केले.

इस्रायलच्या 'एनएसओ' कंपनीच्या 'पेगासस स्पायवेअर'चा वापर करून जगातील अनेक देशांतील सरकार हे महत्त्वाच्या व्यक्तींची हेरगिरी करत असल्याचा दावा 'द गार्डियन' व 'वॉशिंग्टन पोस्ट'मध्ये करण्यात आला. हेरगिरी करणाऱ्या या देशांच्या यादीत भारत सरकारचे नावही आहे. दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये या मुद्द्यावरुन प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत या विषयावर आपली भूमिका मांडली आहे.

फडणवीस म्हणाले की, 'पेगासस विषयीच्या बातम्यांना कुठलाही आधार नाही. हे सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीने देखील याविषयीचे वृत्त फेटाळले आहे. अधिवेशनाच्या एक दिवस पहिले दिवशी अशी बातमी देऊन भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याचा हा कट आहे. जेव्हा जेव्हा भारत पुढे जात आहे असे दिसते, तेव्हा काही लोक आपले हितसंबंध जपण्यासाठी भारताला बदनाम करण्याचा कट रचत असतात. मधल्या काळात काही मीडियांना चिनी फंडिंग असल्याचे वृत्तही आले होते. चिनी पैसा घेऊन ते भारतविरोधी अपप्रचार करत होते. याचा अर्थ स्पष्ट आहे. यामुळे या बातम्यावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. संसदेचे कामकाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...