आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजेट 2022:भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनवणारा हा अर्थसंकल्प, सर्वच घटकांना दिलासा - देवेंद्र फडणवीस

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2-22-23 साठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून बऱ्याच मुद्द्यांना हात घालण्यात आला. यावर आता राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले आहे. मोदी सरकारकडून सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांना समर्पित, भविष्यवेधी आणि भारताला आत्मनिर्भर व बलशाली करणारा असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत याविषयावर भाष्य केले, ते म्हणाले की, 'केंद्र सरकारचा हा अर्थसंकल्प समजातील सर्व घटकांना न्याय देणारा आहे. हा अर्थसंकल्प देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाईल. जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे बलशली भारताचे प्रतिक आहे. असे देखील फडणवीस म्हणाले आहेत.

यासोबतच सोशल मीडियावर फडणवीस म्हणाले की, 'भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, निर्मला सीतारामन यांचे खूप खूप आभार!', असं ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

बातम्या आणखी आहेत...