आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र भाजप:भाजपची कार्यकारिणी जाहीर, पाहा आशिष शेलार, बावनकुळेंसह कोणाकडे आहे कोणती जबाबदारी 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली. या प्रमुख कार्यकारणीत  12 प्रदेश उपाध्यक्ष, 12 सेक्रेटरी, 6 जनरल सेक्रेटरी आणि 1 कोषाध्यक्ष आहेत. असे चंद्रकांत पाटलांनी घोषित केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, या कार्यकारणीत याशिवाय 7 प्रमुख मोर्चे असतात. त्याचे अध्यक्षही आम्ही घोषित करत असतो. या व्यतिरिक्त 18 प्रकोष्ठ म्हणजे वेगवेगळ्या विषयांचे प्रमुख घोषित करत आहोत. यासोतबच प्रदेशाचे कार्यालय, मीडिया, सोशल मीडिया या सर्वांचे प्रमुख आम्ही घोषित करत असणार असल्याचंही ते म्हणाले.

कार्यकारणी सदस्य 69 असतील. निमंत्रित सदस्य 139 जण असतील. सर्व आमदार-खासदार कायम सदस्य असतात. राज्याच्या सर्व सामाजिक स्तर आणि भौगोलिक क्षेत्रांना न्याय देण्यासाठी या कार्यकारणीचा उपयोग होईल.

कार्यकारणीची यादी 

  • महामंत्री

सुजित सिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय, विजय पुराणिक

  • उपाध्यक्ष

संजय कुटे, माधव भंडारी, माजी मंत्री राम शिंदे, चित्रा वाघ, जयकुमार रावल, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार सुरेश हळवणकर, खासदार प्रीतम मुंडे, माधवी नाईक, खासदार कपिल पाटील, खासदार भारती पवार, जयप्रकाश ठाकुर असे 12 उपाध्यक्ष असतील

  • सेक्रेटरी 

माजी आमदार प्रमोद जठार, अर्चना तेहटकर, नागनाथ निरोवदे, राजेंद्र बकाने, संजय पुराम, दयानंद चोरगे, अॅड धर्मपाल मेश्राम, खासदार रक्षा खडसे, संदीप लेले, स्नेहलता कोल्हे, इंद्रिस मुलतानी, अमित गोरखे,

  • मुख्य प्रतोद आणि प्रतोद 

मुख्य प्रतोद आशिष शेलार आणि प्रतोद - माधुरी मिसाळ

0